Apple iPhone 12 Mini Sale: 'अ‍ॅपल आयफोन 12 मिनी' (Apple iPhone 12 Mini) हा फोन परवडणारा फोन म्हणून लॉन्च करण्यात आलेला. स्वस्तात आणि छोट्या आकाराचा फोन म्हणून 'आयफोन 12 मिनी' (iPhone 12 Mini) बाजारपेठेत आणण्यात आला होता. 'आयफोन 12 मिनी' हा सुरुवातीला 69 हजारांना उपलब्ध करुन देण्यात आलेला. हा फोन 'आयफोन 12'पेक्षा 10 हजारांनी स्वस्त होता. म्हणूनच उत्तम फिचर्स, आयफोनच्या सुविधा आणि हाताळायला सोपा असा 'आयफोन 12 मिनी' अनेकांच्या पसंतीस पडला होता. हाच 69 हजारांचा 'आयफोन 12 मिनी' सध्या 11 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.


आताच योग्य वेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लिपकार्टवरील सेलमध्ये  'आयफोन 12 मिनी' ची किंमत किमान डिस्काऊंटसहीत 50 हजार 999 रुपयांपासून सुरु होत आहे. 'आयफोन 12 मिनी' हा तसा जुना म्हणजेच ओल्ड जनरेशन मॉडेल आहे. लवकरच तो फ्लिपकार्टवरही अनअवेलेबल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'आयफोन 12 मिनी' हा जुना म्हणजेच 2 जनरेशन आधीचा फोन आहे. आता 'आयफोन 15' लॉन्च होणार असल्याने 'आयफोन 12 मिनी' फार कमी प्रमाणात उपलब्ध असेल असंही म्हटलं जात आहे. त्यामुळेच जर तुम्ही आयफोन 12 मिनी घेण्याचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. 


सारखेच फिचर्स


'आयफोन 12 मिनी' हा अ‍ॅपल कंपनीचा मिनी व्हर्जनमधील पहिलाच फोन आहे. 'आयफोन 12'ला अपेक्षित असणारा प्रतिसाद मिळाला नाही. या फोनमध्ये 5.4 इंचाचांची स्क्रीन आणि सुपर रेटीना एक्सडीआर डिप्स्ले देण्यात आलाय. तसेच यामध्ये ए14 बायोनिक चीपही आहे. 'आयफोन 12 मिनी'मध्येही 'आयफोन 12' प्रमाणे 12 मेगापिक्सल ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप येतो. 


तब्बल 47 हजार 901 रुपयांची सूट


फ्लिपकार्टवर सध्या 'आयफोन 12 मिनी' हा डिस्काऊंटसहीत 50 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 8 हजार 901 रुपयांची सूट देम्यात आली आहे. तसेच एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डवर ईएमआयवर हा फोन घेतला तर सरसकट 4 हजारांची सूट मिळेल. या कार्डवर 50 हजारांच्यावरील शॉपिंगवर 4 हजारांची सूट दिली जात आहे. त्यामुळे या ऑफरसहीत 'आयफोन 12 मिनी' 46 हजार 999 रुपयांना उपलब्ध होईल. तसेच जुन्या स्मार्टफोनच्या मोबदल्यात एक्सचेंज ऑफरअंतर्गत फोनवर 35 हजारांची अतिरिक्त सूट मिळेल. या सर्व ऑफर्सचा विचार केला तर 'आयफोन 12 मिनी' केवळ 11 हजार 999 रुपयांना विकत घेता येईल. म्हणजेच या फोनवर तब्बल 47 हजार 901 रुपयांची सूट मिळेल.