iphone 14 flipkart offers: आयफोन 14 सध्या अ‍ॅपल कंपनीचा सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन भारतात लॉन्च झाला होता. मात्र या फोनची किंमत अधिक असल्याने अनेकांनी इच्छा असूनही हा फोन विकत घेतलेला नाही. मात्र आता 'फ्लिपकार्ट'वर या फोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. आयफोनवर आतापर्यंत देण्यात आलेली ही सर्वात मोठी सूट असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑफर्स नेमक्या काय आहेत पाहूयात पाच महत्त्वाच्या मुद्द्याच्या माध्यमातून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

> 'फ्लिपकार्ट'वर आयफोन 14 (iphone 14) चं 128 जीबी व्हेरिएंट 79 हजार 900 रुपयांऐवजी 66 हजार 999 रुपयांना असल्याचं दाखवलं जात आहे. म्हणजेच ग्राहकांना या फोनवर जवळजवळ 13 हजारांची सूट देण्यात आली आहे. एकूण 12 हजार 901 रुपयांची सूट देण्यात आली आहे.


> इतकच नाही तर ग्राहकांना या स्मार्टफोनवर सिटी आणि आयसीआयसीआय बँकांच्या कार्डवर एक हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय ग्राहकांना जुन्या फोनच्या मोबदल्यात म्हणजेच एक्सचेंज ऑफरअंतर्गत 20 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.


> याचप्रमाणे ग्राहक नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचाही लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना 256 जीबी आणि 512 जीबी व्हेरिएंटवर सूट देण्यात आली आहे. हा फोन लाल, निळ्या, मिडनाइट, पर्पल आणि स्टारलाइट रंगामध्ये उपलब्ध आहे. 


> आयफोन 14 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाल्यास या स्मार्टफोनमध्ये ए15 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60 एचझेड रिफ्रेट रेटसहीत येतो.


> हा स्मार्टफोन लेटेस्ट आयओएस 16 या सिस्टीमवर काम करतो. यामध्ये फाइव्ह जी, वायफाय, ड्युएल सिम, ब्लूटूथ, जीपीएस आणि लायटिंग पोर्टची सपोर्ट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा देण्यात आले आहेत.