नवी दिल्ली : सध्या अ‍ॅपलचे दिवस वाईट सुरू आहेत. आयफोन स्लोडाऊन झाल्यानंतर अ‍ॅपलकडून माफीही मागण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने बॅटरी रिप्लेसमेंटच्या किंमतीही कमी केल्या आहेत. आता सूत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आली आहे की, अ‍ॅपल आपल्या ग्राहकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी आयफोनच्या किंमती कमी करणार आहे. 


विक्री घटली


डिजीटाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, आयफोन एक्सची विक्री अ‍ॅपलच्या अपेक्षेनुसार होत नाहीये. त्यामुळे कंपनी काही बदल करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅपलने सुरूवातीला ५ कोटी आयफोन विकण्याची अपेक्षा ठेवली होती. पण आतापर्यंत केवळ ३ कोटी यूनिट्सच विकण्याची शक्यता दिसत आहे. 


इतर आयफोन्सच्याही किंमती कमी?


जर चर्चांवर विश्वास ठेवायचा तर केवळ आयफोन एक्स नाहीतर इतरही स्मार्टफोन्सच्या किंमती कमी होऊ शकता. यात आयफोन ८, आयफोन ८ प्लस मुख्य आहेत. अ‍ॅपलने आत्तापर्यंत आपल्या आयफोन एक्स च्या सेलची कोणतीही माहिती शेअर केली नाहीय.