बदलत्या काळासोबत अपडेटेड टेक्नॉलॉजी देणाऱ्य़ा ब्रँडपैकी एक अॅपल. हा अॅपल ब्रँड आता आपला एक प्रोडक्ट कायमचा बंद करणार आहे. कधीकाळी अपलचा दमदार प्रोडक्ट राहिलेला iMac Pro कॉम्प्युटरचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय अपल कंपनीने घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच कंपनीने आपल्या वेबसाईटवर मॉडेल पेज अपडेट केलं होतं. यावेळी ग्राहकांना सांगण्यातही आलेलं की, जोपर्यंत पुरवठा आहे, तोपर्यंत कंपनी हे प्रोडक्ट्स विकेल. वेबसाईटवरील कस्टम ऑर्डरचा पर्यायही कंपनीने हटवला आहे.


कंपनीने याआधीही सांगितलेलं की, आयमॅकचे प्रोडक्ट तेव्हाच बंद केले जातील, जेव्हा ते आऊट ऑफ स्टॉक होतील. पण तरीही आयमॅक बंद करण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे मात्र अॅपलने अजूनही सांगितलेलं नाही.


असं सांगितलं जातंय की आयमॅक बंद करून अपल कंपनी दुसरं दमदार प्रोडक्ट लाँच करेल.


ऑगस्ट 2020 मध्ये iMac Pro चा 8 कोअर मॉडेल आणि 10 कोर व्हर्जन बेस पर्याय बंद केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅपल ऑल इन वन असा कॉम्प्युटर रिडिझाईन करू शकतो.


iMac Pro हा अॅपलचा दमदार फिचर्स असलेला प्रोडक्ट होता. ज्यामध्ये व्हीडिओ एडीटिंगसह 3D मॉडेलिंगही करता येत होतं.