मुंबई: तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला कोणतीही अडचण आली तर सर्वप्रथम गुगल सर्च इंजिनचा आधार घेता. कारण गुगल सर्च इंजिनवर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहज मिळतं. त्यामुळे कोणताही प्रश्न अडला तर सर्वात आधी गुगलची मदत घेतली जाते. सध्या गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अ‍ॅपल नवी सेवा सुरू करणार आहे. अ‍ॅपल आगामी काळात स्वतःचे सर्च इंजिन लाँच करणार आहे.  हे एक नवीन यूजर सेंट्रिक एरब सर्च इंजिन असेल जे जानेवारी 2023 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅपलने या सर्च इंजिनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु याची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. टेक ब्लॉगर रॉबर्ट स्कोबल यांनी अ‍ॅपलच्या आगामी सेवांबद्दल माहिती दिली आहे. अ‍ॅपल त्यांच्या इव्हेंट, WWDC 2023 मध्ये लाँच करणार आहे. यामध्ये अ‍ॅपलच्या नवीन सर्च इंजिनचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉबर्ट स्कोबल यांनी ही माहिती दिली आहे.


अ‍ॅपलचे नवीन सर्च इंजिन जानेवारीमध्ये लाँच केले जाईल. मात्र तत्पूर्वी अ‍ॅपलचा WWDC 2022 इव्हेंट येणार आहे. अ‍ॅपल या इव्हेंटमध्ये MacBook Air सोबत नवीनतम iOS 16, iPad OS 16, WatchOS आणि MacOS 13 सॉफ्टवेअर अपडेट्स जारी करू शकते. लीक्सनुसार, आयफोन 14 सीरीज देखील या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे.