वॉशिंग्टन : जगभरातील मोबाईल चाहत्यांची पहिली पसंती असणाऱ्या अॅपलने मंगळवारी रात्री आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे तीन नवे फोन बाजारात आणले आहेत. आयफोन ११ला पाठीमागे २ कॅमेरे देण्यात आलेत. शिवाय १२ मेगापिक्सल नाईटमोड कॅमेराही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासह डॉल्बी आवाज, फोर-के, स्लो मोशनची सुविधा, दोन मीटरपर्यंत पाण्यात चालण्याची क्षमता, वायफाय-६ची सुविधा यात देण्यात आलीये तर ११-प्रो आणि प्रो मॅक्स हे फोन ५.८ आणि ६.५ इंचाचे आहेत. यात आयफोन ११चे सर्व तंत्रज्ञानतर आहे. 


शिवाय ओलेड, पी-३ तंत्रज्ञान, सुपर रॅटिना एचडीआर डिस्प्लेची सुविधा देणअयात आलीये. डीप फ्युजन आणि न्यू नाईट मोडमुळे या फोनमधून छायाचित्रे अधिक सुस्पष्ट येतील. 


हे दोन्ही मॉडेल मिडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिल्व्हर आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहेत.. या मोबाईलसह अॅपलनं मॅक टीव्ही, आयपॅड तसंच अॅपल वॉचही बाजारात आणले आहे.