मुंबई : जगभरातील मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सना पाहून एक इंटर ब्रॅन्ड रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये सलग पाचव्या वर्षी अ‍ॅपल कंपनीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सच्या यादीमध्ये अ‍ॅपलची किंमत 3% वाढून सुमारे 12 लाख करोड झाली आहे. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर गूगल आणि तिसर्‍या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचा समावेश झाला आहे. 


टॉप टेन कंपनींमध्ये 6 टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपन्या आहेत. यंदा फेसबुकने सर्वाधिक म्हणजे 48% ग्रोथ झाल्याचे स्पष्ट केले आहे. टॉप टेन ब्रॅन्डपैकी टोयाटो आणि मर्सिडीज बेंज या कंपन्यांचे ब्रॅन्ड व्हॅल्यूदेखील 3.27 आणि 3.11 लाख करोड़ आहेत. अमेझॉनने यंदा 29% ग्रोथ दाखवून पाचवे स्थान कमावले आहे. 


मीडिया, टेक्नोलॉजी आणि ऑटोमोटीव्ह पाहता नेटफ्लिक्स, सेल्फफोर्स आणि फरारी यांचा समावेश केला आहे. या तीन कंपन्यांपैकी नेटफ्लिक्सची ब्रॅन्ड व्हॅल्यू सर्वाधिक म्हणजे 36, 335 करोड झाली आहे. त्यानंतर 33,930 करोड ब्रॅन्ड व्हॅल्यू असलेली  सेल्सफोर्स  कंपनी आहे तर फरारी 31,655 करोड ब्रॅन्ड व्हॅल्यूची आहे.