भारतात पहिल्यांदाच होणार iPhone 11ची निर्मिती
`मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत...`
नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी ऍपल Apple भारतात पहिल्यांदा त्यांचं प्रमुख मॉडेल असणाऱ्या iPhone 11ची निर्मिती manufacturing iphone 11 करणार आहे. त्यासाठी चेन्नई येथे फॉक्सकॉन प्लांटमध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनी iPhone SE 2020 हे मॉडेलही भारतात बनवण्याबाबत विचार करत आहे. हे मॉडेल भारतात बनल्यास ते बंगळुरु येथील विस्टर्न प्लांटमध्ये तयार केलं जाईल.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ट्विट करत याबाबत घोषणा केली. 'Apple कंपनीच्या टॉप मॉडेलपैकी एक असणारा iPhone 11 भारतात बनणार आहे. मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत.' असं गोयल म्हणाले.
याआधी टेक गेंटने 2019 मध्ये iphone XR भारतात असेंबलिंग करण्यास सुरुवात केली होती. 2017 मध्ये Appleने iphone SEचं काम बंगळुरु येथील प्लांटमध्ये सुरु केलं होतं.
सोलर पॅनलद्वारे मोफत वीजेसह पैसे कमावण्याची संधी
फॉक्सकॉन ऍपलचा सर्वात मोठा सप्लायर आहे. जो आता भारतातील फॅक्ट्रीमध्ये एक बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.