मुंबई : मोबाईल जगतात, अतिशय लोकप्रिय असणाऱ्या अॅपल या ब्रँडकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. जगविख्यात अशा अमेरिकन टेक कंपनी अॅपलकडून १४ सप्टेंबरला एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा इवेंट डिजीटल स्वरुपात पार पडेल. यावेळी कंपनी iphone 13 सिरीज लॉन्च करेल. यावेळी चार नवे आयफोन पाहायला मिळतील. आयफोन 13 सनसेट गोल्ड रंगासोबत उपलब्ध केला जाईल. यासोबतच ड्युअल रिअर कॅमेरा आणि फ्रंट नॉच देखील दिले जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर कार्यक्रमासाठी अॅपलने मीडिया इन्वाइट्सही पाठवायला सुरुवात केली आहे. या इन्वाईटवर california streaming लिहीण्यात आलं आहे. अॅपल पार्कमधून हा इवेंट लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल. कंपनीच्या वेबसाईटवरुनही हा इवेंट पाहता येऊ शकतो.अॅपलच्या या इवेंटमध्ये iphone 13 सिरीजसोबत अॅपल वॉच सिरीज ७ पण लॉन्च केलं जाईल. कारण कंपनी आयफोनसोबतच अॅपल वॉच देखील लॉन्च करते.


सूत्रांच्या माहितीनुसार,  कंपनीच्या इन्बाईटवरुन नेमकं काय लाँच करण्यात येणार आहे हे अस्पष्ट असल्यामुळं असंही म्हटलं जात आहे की, कंपनी यावेळी iphone 13 ऐवजी phone 12s सिरीज लॉन्च करु शकते. यामुळे आता हे लॉन्चिंगच्यावेळीच पाहायाला मिळू शकतं. iphone 13 सिरीज संबधित बरेच रिपोर्ट्स समोर आले आहेत. ज्यामध्ये फोनचे फिचर्स, डिझाईन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी मात्र डिझाईनमध्ये फारसा बदल पहायला मिळणार नाही. यावेळीही देखील कंपनीचं मुख्य लक्ष्य कॅमेरावर असेल. यावेळी देखील अॅपल फोनमध्ये तीन रियर कॅमेरे मिळतील. मात्र सेंसर वेगळे असतील. 


आयफोनच्या नव्या वर्जनमध्ये यावेळी नवीन प्रोसेसर देखील पहायला मिळेल. सॅटेलाईट कनेक्टिविटी फिचर मिळण्याची देखील खबर आहे. सॅटेलाईट कॉलिंग फीचर लिमिटेड यूजसाठी देण्यात येवू शकतं. कदाचित या फिचरला भारतात वापरण्याची परवानगी मिळणार नाही. मात्र हे सगळं १४ सप्टेंबरला आपल्या सगळ्यांसमोर येईलच. याचबरोबर यावेळी iphone 13साठी कंपनी नवं काय करतेय किंवा मागच्यावेळी सारंखं जुन्या सिरीजचीच कॉपी करुन नारज करतेय का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.