अॅपलचा iPhone युजर्संना दणका! 1 ऑक्टोबरपासून बंद होतेय ही सर्व्हिस, कारण...
Apple Update: अॅपलने आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून एक सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे.
iPhone Update: आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अॅपल कंपनीने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. कंपनीकडून आता X (Twitter) आणि युट्यूब सारख्या अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कस्टमर सपोर्ट प्रोव्हाइड केले जाणार नाहीये. एका रिपोर्टनुसार, Apple आता त्यांच्या कस्टमर सपोर्टमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहेत. ज्यात ट्विटर, युट्यूब आणि Apple सपोर्ट कम्युनिटी वेबसाइट सारख्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया सपोर्ट एडवायजर्स बंद करण्याच्या तयारीत आहेत.
तुम्ही आयफोन युजर्स असाल तर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुमची समस्या रिपोर्ट करु शकणार नाहीत. म्हणजेच, तुम्हाला फोन संबंधित काही समस्या निर्माण झाली असाल तर तुम्ही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने अॅपल कर्मचाऱ्यांची मदत मिळणार नाहीये. 1 ऑक्टोबरपासून @AppleSupport ट्विटर अकाउंट युजर्सच्या DMला वैयक्तिक रिप्लाय देऊ शकणार नाहीत. त्या व्यतिरिक्त, ग्राहकांना ऑटोमॅटिक रिप्लाय पाठवण्यात येणार आहे. यात ग्राहकांना मदत कुठे मिळेल याविषयीचे पर्याय देण्यात येतील.
Apple आपल्या YouTube सपोर्ट चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये टेक्निकल सपोर्ट देणे थांबवणार आहे, तसेच Apple सपोर्ट कम्युनिटीतील सशुल्क समुदाय कम्यूनिटी स्पेशलिस्ट बंद होणार आहे.
अॅपलची युजर्ससाठी खुशखबरी
अॅपलचा 12 सप्टेंबरला एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात आयफोन 15 आणि अॅपलची नेक्स्ट जनरेशन लाँच करण्यात येणार आहे. अॅपलने या इव्हेंटची टॅगलाइन Wonderlust ही दिली आहे. अॅपलच्या या इवेंटमध्ये iPhone 15 च प्रमुख आकर्षणाचा मुद्दा ठरणार आहे. जिथं अॅपलच्या फोनचे दोन एँट्री लेवल आणि दोन हाय एंड मॉडेल समाविष्ट असती
रिपोर्टनुसार, आयफोन 15 Pro मागील वर्षांच्या तुलनेने जास्त किमतीने लाँच होणार आहे. iPhone 15 सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र प्रो मॉडल्स उशीराने बाजारपेठेत दाखल होणार आहे. आयफोन लाँच होण्याआधीच त्याची किंमतही लीक झाली आहे. iPhone 14 Pro Maxच्या तुलनेने 200 डॉलर जास्त किमत असणार आहे.
नव्या फोनची फ्रेम आता स्टीलऐवजी टीयटॅनियमची असून फोनची जाडीही फार कमीच असेल. ज्यामुळं फोनचं वजन आता आणखी कमी असणार आहे. अॅपल त्यांच्या नव्या फोनची किमत 1299 डॉलर म्हणजेच 1,06,500 रुपये असू शकते.