मुंबई : अँड्रॉईड युजर्स काहीही सर्च करण्यासाठी किंवा ऍप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचा वापर करतात. गुगल प्ले स्टोअर्समधून डाऊनलोड केलेले ऍप्स हे सेफ असतात. म्हणून आपल्यापैकी बरेच लोक तेथून कोणतेही ऍप डाऊनलोड करतात. परंतु आता गुगलने स्वत: चेतावनी दिली आहे की, त्याने प्ले स्टोअरमधून अनेक अॅप्स काढून टाकले आहेत. Google ने सांगितले की, जे ऍप नियमितपणे त्यांच्या धोरणाचे पालन करत नाहीत अशा अ‍ॅप्सवर ते "योग्य कारवाई" करते.


1 कोटी+ डाउनलोड केलेले काही अ‍ॅप्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया अहवालानुसार, Google Play Store वरून काढलेल्या डझनभर अ‍ॅप्सपैकी एक QR कोड स्कॅनर, एक हवामान अ‍ॅप आणि मुस्लिम प्रार्थना अ‍ॅप यांचा समावेश आहे.


या अ‍ॅप्समध्ये कथितपणे असा कोड आह,  ज्यामुळे लोकांचा डेटा चोरला आहे, अहवालात म्हटले आहे की, काही अ‍ॅप्स 10 दशलक्ष (म्हणजे 1 कोटी) वेळा डाउनलोड केले गेले आहेत.


अलीकडे, Google ने Play Store वरून Sharkbot Bank Stealer मालवेअरने संक्रमित सहा अ‍ॅप्स काढून टाकले. हे अ‍ॅप्स युजर्सचे कॉन्टॅक्ट, संदेश, डॉक्युमेंट इ. सारख्या गोष्टींचा डेटा गोळा करत होते, ज्यामुळे त्यांना गुगलने Play Store वरून काढून टाकले आहे.


Google के नियम किंवा धोरण काय आहे?
Google च्या डेव्हलपर सामग्री धोरणानुसार, फसवणूक करणारे, दुर्भावनापूर्ण किंवा कोणत्याही नेटवर्क, डिव्हाइस किंवा वैयक्तिक डेटाचा गैरवापर करण्याचा हेतू असलेले अ‍ॅप्स Google Play Store वरून कडकपणे प्रतिबंधित आहेत. अॅप डेव्हलपर्सना असेही बजावण्यात आले आहे की, ते वापरकर्त्यांसोबत शेअर करत असलेल्या माहितीबाबत त्यांनी स्पष्ट असावे.


गुगलने प्ले स्टोअरवरून 6 अ‍ॅप काढून टाकले


गुगलने प्ले स्टोअरवरून सहा अ‍ॅप काढून टाकल्यानंतर ही समस्या समोर आली आहे. हे अ‍ॅप्स Android स्मार्टफोनसाठी अँटीव्हायरस सोल्यूशन म्हणून सादर करण्यासाठी डिझाइन केले होते.


हे अ‍ॅप्स 'शार्कबॉट बँक स्टीलर' मालवेअरने संक्रमित झाले होते आणि ते 15,000 वेळा डाउनलोड केले गेले होते. फोनला टार्गेट करणार्‍या अ‍ॅप्सनी इटली आणि युनायटेड किंगडममधील वापरकर्त्यांची लॉगिन क्रेडेन्शियल्स चोरण्यासाठी जिओफेन्सिंग वैशिष्ट्याचा वापर केला आहेत.


या वर्षाच्या सुरुवातीला, एका सुरक्षा फर्मने अँड्रॉइड स्मार्टफोनवरील वापरकर्त्यांची आर्थिक माहिती चोरणारे अ‍ॅप शोधून काढले. अ‍ॅप एक ओपन-सोर्स अ‍ॅप्लिकेशन म्हणून होते, जे समान कार्यक्षमता प्रदान करते. हे एका वाईट बँकिंग ट्रोजनने संक्रमित झाले होते आणि ते Google Play Store वरून काढून टाकण्यापूर्वी 10 हजारापेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले होते.