आरोग्य सेतू अँपने बनवला `हा` रेकॉर्ड
आरोग्य सेतू अँप हे गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड
नवी दिल्ली : कोरोना बद्दल जनजागृतीसाठी आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. हे अँप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हे सांगते.
गुगलवर नंबर वन
आरोग्य सेतू अँप हे गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेले अँप आहे. या अँपचं वैशिष्ट्य असं की अँप लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच हे अँप एक कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. अवघ्या काही दिवसांत आरोग्य सेतुने फेसबुक, टिकटॉक आणि व्हॉट्सएपला मागे टाकले आहे.
हे ही वाचा : काय आहेत आरोग्य सेतू अँपचे फायदे?
सर्वात जलद
१५ दिवसांच्या आत आरोग्य सेतू अँपने ऐतिहासिक रेकॉर्ड केलाय. याला कोट्यावधी युझर्सने डाऊनलोड केलंय. भारतात ८२ टक्के युझर्सनी या अॅंपला ५ स्टार रेटींग दिलं आहे. यामुळे अमेरिका आणि चीनच्या सर्व इंटरनेट कंपन्यांच्या कमाईवर प्रभाव झाला आहे.
अँप डाऊनलोड कसं कराल?
हे अँप तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करू शकता. हे अँप अकरा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. अँप इन्स्टॉल केल्यानंतर त्यात सेटअप करणंही सोपं आहे. तुमच्या फोनमध्ये लोकेशनला Always On ठेवायचं आहे आणि Bluetooth सुद्धा चालू ठेवायचं आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना तुम्हाला फोनवर ओटीपी पाठवला जाईल आणि त्याचा तुम्हाला वापर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील भरावा लागेल. त्यात नाव, पत्ता, वय, व्यवसाय, प्रवासाचा तपशील याशिवाय तुमच्या आरोग्याशी संबंधित काही प्रश्न विचारले जातील आणि ती माहिती तुम्हाला भरावी लागेल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही २० सेकंदांची सेल्फ असेसमेंट टेस्ट करू शकता, पण ती नंतरही केली जाऊ शकते.
अँप सांगेल कोरोनाचे लक्षण आहेत की नाहीत
या अँपमध्ये सेल्फ टेस्टचा पर्याय आहे, ज्यात तुमच्या आरोग्याची माहिती मागितली जाते. या माहितीच्या आधारे तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणं असू शकतात का हे अँप सांगतं. हे अँप तुमचा तपशील सरकारला पाठवतं. त्यानंतर गरज असेल तर आरोग्य मंत्रालयाकडून तुमच्यासाठी आयसोलेशन प्रक्रिया सुरु केली जाईल. हे अँप अशा रितीनं बनवलं आहे की जर एखादा अँप युजर आपल्या जवळच्या भागात असेल आणि त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल तर किंवा त्याच्यात कोरोनाची लक्षणं असतील तर त्याची माहिती आपल्याला नोटीफिकेशनद्वारे दिली जाईल.