मुंबई : तैवानची टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी असूसने, सोमवारी आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन Asus ZenFone Max Pro M1 अखेर सर्वांसमोर आणला. Asus ZenFone Max Pro M1 फोनला भारतात सर्वप्रथम लॉन्च करण्यात आलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे असूस तसा बजेट फोन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असूस सोबत 18:9 डिस्प्ले, डुअल रियर कॅमरा सेटअप आणि ५ हजार एमएएचची बॅटरी मिळेल, यासह स्टॉक अँड्रॉईडसह हा कॅमेरा येईल. ZenFone Max Pro M1 ची सरळ लढत लोकप्रिय शाओमी रेडमी नोट ५ प्रो सोबत असेल.


Asus ZenFone Max Pro M1ची किंमत 


 


ZenFone Max Pro M1 ची किंमत 10 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. या किंमतीत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज वेरिएंट मिळणार आहे, 4 जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वॅरिएंटसाठी किंमत आहे, १२ हजार ९९९ रूपये. या फोनची विक्री ३ मे पासून फ्लिपकार्टवरून सुरू होईल. युझर्स या फोनला मिडनाईट ब्लॅक आणि ग्रे रंगात खरेदी करू शकतील. 


मुख्य स्पेसिफिकेशन


डिस्प्ले : 5.99 इंच
प्रोसेसर :  ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमरा :  8-मेगापिक्सल
रिझोल्यूशन :  1080x2160 पिक्सल
रॅम :  3 जीबी
ओएस अॅड्रॉ़ईड  :  8.1 Oreo
स्टोरेज :  32 जीबी
रिअर कैमरा :  13-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता :  5000 एमएएच