ASUS च्या या स्मार्टफोनची फ्लिपकार्ट प्री-ऑर्डर सुरू
असूसने एप्रिल महिन्यात झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला.
मुंबई : तैवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असूसने एप्रिल महिन्यात झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला. यानंतर आता कंपनीने यासाठी, आजपासून फ्लिपकार्टवर दुपारी १२ पासून प्री ऑर्डर सुविधा सुरू केली आहे. हा फोन तुम्हाला मिडनाईट ब्लॅक आणि ग्रे कलर वेरियंटमध्ये उपलब्ध केला आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ऑर्डर केला तर तुम्हाला, ४९ रूपयांचा प्रोटेक्शन मिळेल. ज्यात स्क्रीन तुटणे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खराब होणे, पाण्यात फोन पडण्याची समस्या असे प्रोटेक्शन मिळतील, असं सांगण्यात आलंय.
या फोनची किंमती जवळ जवळ १२ हजार ९९९ रूपये आहे. असूसचा हा फोन 18:9 आस्पेक्टचा रेशिया असणाऱ्या बेजल लेस डिस्प्लेसह आहे. ASUS चा हा फोन अनेक गोष्टींमुळे खास आहे. असूस जेनफोन मॅक्स प्रो एम1 ते फीचर्सबद्दल बोलायचं म्हटलं तर, यात ६ इंचाची फुल व्ह्यूव्ह डिस्प्ले आहे आणि यात क्वालॉम स्नॅपड्रॅगन ६३६ चिपसेट प्रोसेसर आहे.
जाणून घ्या या फोनची काही फीचर्स
Zenfone Max Pro M1 ची किंमत 12,999 रूपये आहे
यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट प्रोससर उपलब्ध आहे.
या फोनचा डिस्प्ले ६ इंचाचा आहे.
इंटरनल स्टोरेज 32GB चा आहे
या फोनचं माइक्रोएसडी कार्ड 64GB चं आहे.
Zenfone Max Pro M1 चा रिअर कॅमेरा 13MP/15MP तर पुढचा कॅमेरा 8MP चा आहे.
या शानदार स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप 5000mAh आहे.