5 रुपयाच्या फेवीक्विकने देखील ATM होणार हॅक
कसा रोखणार हा धोका
मुंबई : आता आपण सगळेचजण एटीएम कार्डचा वापर करतो. त्यामुळे त्यासंदर्भात सतर्कता बाळगणं आपली जबाबदारी आहे. हॅकर्सने अकाऊंट हॅक करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. अवघ्या 5 रुपयांच्या फेविक्विकने हॅकर्स तुमचे लाखो रुपये चोरू शकतात. ही पद्धत बघून पोलीस देखील थक्क झाले आहेत.
चौकशीत असं कळलं आहे की, हॅकर्स अवघ्या 5 रुपयांच्या फेविक्विकने लाखो रुपयांचा गंडा लावू शकतात. तसेच त्यांना एटीएम मशीनमधील एका अशा बटनाची देखील माहिती आहे जे बटन दाबल्यावर एटीएम मशीन काही काळ हँग होणार आहे. यानंतर ते ग्राहकांच कार्ड बदलून खात्यातून पैसे काढून घेतात. हॅकर्स कायम आपल्यासोबत फेविक्विक ठेवतात आणि हे फेविक्विक मशीनच्या कीपॅडवर लावलं जातं. आणि ग्राहकांसोबत कोणत तरी कारण काढून एटीएममध्ये घुसतात.
अशा पद्धतीने बघतात एटीएम मशिन
फेविक्विक कीपॅडला लावल्यामुळे बटन सहज दाबली जात नाही म्हणून ग्राहक सतत बटन दाबत राहतात. या दरम्यान हे हॅकर्स पीन पॅटर्न बघून घेतात. तसेच पैसे सहज येत नसल्यामुळे मदत करण्याच्या कारणाने संवाद साधतात. फेविक्विक लावल्यामुळे कीपॅड तेव्हा देखील चालत नाही. त्या दरम्यान ग्राहकांना बोलण्यात व्यस्त ठेवून हे लोकं एटीएम कार्ड बदलतात. अशा पद्धतीने दुसऱ्या एटीएममधून हे लोकं पैसे काढतात.