वाह क्या बात है! Audi ने भारतात लाँच केली स्पेशल SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ऑडीच्या गाड्यांबात कारप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता राहिली आहे. त्यामुळे ऑडीची नवीन गाडी लाँच झाली की झाली कारप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचते. नुकतीच ऑडी इंडियाने देशात Q5 एसयूव्हीची स्पेशल आवृत्ती लाँच केली आहे.
Audi Q5 Special Edition: ऑडीच्या गाड्यांबात कारप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता राहिली आहे. त्यामुळे ऑडीची नवीन गाडी लाँच झाली की झाली कारप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचते. नुकतीच ऑडी इंडियाने देशात Q5 एसयूव्हीची स्पेशल आवृत्ती लाँच केली आहे. टेक्नोलॉजी ट्रिमवर आधारीत या गाडीचे मर्यादित मॉडेल बाजारात विकले जाणार आहेत. नेव्हिगेशन सपोर्टसह 8.3-इंचाची MMI इन्फोटेनमेंट सिस्टीम, मेमरी फंक्शनसह मिरर आणि ऑटो फोल्डिंग फीचर, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन माउंट यासारखी वैशिष्ट्ये आहेत. स्पेशल एडिशन मॉडेल रेग्युलर टेक्नॉलॉजी व्हेरियंटपेक्षा 84,000 रुपयांनी महाग आहे. या गाडीची किंमत 67.05 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत या गाडीत काही बदल करण्यात आले आहेत.
ब्लॅक स्टाइलिंग पॅकेजसह आयबिस व्हाइट आणि डिस्ट्रिक्ट ग्रीन या दोन रंगांच्या पर्याय असणार आहे. ग्रिलवरील ऑडी लोगो, विंग मिरर, छतावरील रेल आणि टेलगेटवरील ब्लॅक-आउट ट्रीटमेंट त्याच्या स्पोर्टी आकर्षणात भर पडणार आहे. यात नवीन ग्रेफाइट ग्रे फिनिशसह 5-स्पोक व्हील दिले आहेत. रेग्युलर मॉडेलसारखंच ऑडी Q5 स्पेशल एडिशनमध्ये 2.0L, 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं असून 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलं आहे. हे इंजिन 249bhp ची पीक पॉवर आणि 370Nm टॉर्क जनरेट करू शकते. कम्फर्ट, डायनॅमिक, इंडिविज्युअल, ऑटोमॅटिक आणि ऑफ-रोड मोड दिले आहेत.
Maruti ने लाँच केल्या 3 स्वस्त सीएनजी कार, 30 किमीपर्यंत मिळणार मायलेज
पॅनोरामिक सनरूफ, इंटीरियर अॅम्बियंट लाइटिंग, स्पीच रेकग्निशनसह इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, लेदर अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, अँटी-ग्लेअरसह रियर व्ह्यू मिररमध्ये स्वयंचलित डे/नाईट, रिव्हर्सिंग कॅमेरा असे फीचर्स आहेत. यासोबतच पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.