Diwali Gift 2023: मुकेश अंबांनी देशातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. जगभरातील श्रीमंतांच्य यादीतही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या टॉप 10 मध्ये समावेश होतो. मुंबईत मुकेश अंबांनी यांचं अँटिलिया नावाचं अलिशान निवासस्थान आहे. अंबांनी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या आणि आधुनिक कार आहेत. आता दिवाळीनिमित्ताने अंबांनी यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांनी (Nita Ambani) यांना दिवाळी निमित्ताने Rolls Royce Cullinan SUV ही महागडी कार गिफ्ट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती मुकेश अंबांनी यांचा Z+ सिक्युरिटीचा ताफा जेव्हा रस्त्यावरुन जातो, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या पाहिला मिळतात. त्यांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित कारचा समावेश असतो. आता त्यांनी आपल्या पत्नीलाही महागडी कार गिफ्ट केली आहे. देशातील हे सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट असल्याचं बोललं जातंय. 


दिवाळी निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबांनी यांनी रोल्स रॉयस कलिननच्या ब्लॅक बेज एडिशन एसयूवी गिफ्ट केली आहे. ही कार खूप सुरक्षित आणि महागडी कार मानली जाते. रोल्स रॉयसची किंमत कोटीच्या घरात असते. पण या कारची किंमत एक-दोन कोटी नाही तर तब्बल 10 कोटी रुपये इतकी आहे. 


Rolls Royce Cullinan Black Badge Edition: पाच खास फिचर्स


- Rolls-Royce मध्ये कस्टमायझेशन सुविधा आहेत. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कारमध्ये तुम्हाला हवे तसे बदल करू शकता. अल्ट्रा-लक्झरी SUV कार 6.75 लीटर ट्विन टर्बो V12 इंजिनच्या पॉवरने सुसज्ज आहे. 


- नियमित कुलीननच्या तुलनेत, ब्लॅक बॅज एडिशनमध्ये ग्लॉस ब्लॅक हायलाईट्स देण्यात आलं आहे. यात आयकॉनिक 'Spirit of Ecstasy' चाही समावेश आहे. यामुळे कार भव्य रुप मिळतं. 


- स्टँडर्ड कलिननची कमाल पॉवर 571 PS इतकी आहे, तर Cullinan ब्लॅक बॅजची कमाल पॉवर आउटपुट 600 PS आहे. या कारमध्ये टॉर्क आउटपुट 850 Nm वरून 900 Nm पर्यंत वाढवण्यात आला आहे. 


- कलिनन ब्लॅक बॅजचा वेग वाऱ्याशी स्पर्धा करणारा ाहे. या अल्ट्रा लग्झरी कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रती तास इतका आहे. 


- ही जगातील सर्वात प्रीमियम एसयूव्ही मानली जाते. कलिनन ब्लॅक बॅजच्या आतील भागाचे काही घटक कार्बन फायबरमध्ये बनवलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील ही कार महत्त्वाची मानली जाते.


अंबानी कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब असून त्यांच्या 15 हजार कोटी रुपयांच्या घरात भव्य गॅरेज आहे. यात जगभरातील महागड्या कार्सचा समावेश आहे.