Upcoming 7 Seater SUV In India: देशात सर्वाधिक मागणी ही एसयूव्ही गाड्यांना आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसयूव्ही आरामदायी असतात. त्यामुळे ऑटो कंपन्या एकापेक्षा एक सरस एसयूव्ही बाजारात आणत आहेत. जर तुम्हीही एसयूव्ही घेण्याचा विचारात असाल तर थांबा, कारण नव्या एसयूव्ही येत्या काही दिवसात दाखल होणार आहे. तुमच्याकडे या विभागातील एसयूव्ही खरेदी करण्याचा पर्याय असतील. 2023 मध्ये अनेक नवीन मॉडेल्स येणार आहेत. यामध्ये फोर्स गुरखा (FORCE GURKHA), महिंद्रा बोलेरो निओ (MAHINDRA BOLERO NEO), टाटा सफारी फेसलिफ्ट (TATA SAFARI FACELIFT) आणि एमजी हेक्टर प्लस फेसलिफ्ट (MG HECTOR PLUS FACELIFT) यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5-DOOR FORCE GURKHA- देशात लवकरच 5 डोअर फोर्स गुरखा ही एसयूव्ही लाँच होणार आहे. या गाडीचे चार मॉडेल लाँच केले जाणार आहेत. यात 6, 7, 9 आणि 13 सीटचा पर्याय असणार आहे. सहा सीटर व्हेरियंटमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रोमध्ये कॅप्टन सीट्स असणार आहेत. तर 7 सीटर व्हेरियंटमध्ये मधल्या रोमध्ये बेंट टाईप सीट आणि तिसऱ्या रोमध्ये कॅप्टन सीट्स असतील. या गाडीची किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे. 


MAHINDRA BOLERO NEO PLUS- महिंद्रा बोलेरो निओ प्लस येत्या काही महिन्यांत लाँच केली जाणा आहे. मात्र कंपनीने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. ही एसयूव्ही 7 आणि 9-सीट पर्यायांमध्ये उपलब्ध होईल. या गाडीमध्ये थारमधील 2.2L mHawk डिझेल इंजिन मिळू शकते. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.


Cheapest EV: या आहेत देशातील सर्वात स्वस्त 5 इलेक्ट्रिक कार, पाहा Photo


TATA SAFARI FACELIFT- टाटा मोटर्स फ्लॅगशिप एसयूव्ही सफारी पुढच्या वर्षी लाँच करणार आहे. या गाडीत अपडेट म्हणून ADAS दिले जाऊ शकते. यात 360 डिग्री कॅमेरा, एअर प्युरिफायर आणि हवेशीर फ्रंट सीट्स देखील मिळू शकतात. एसयूव्हीची इन्फोटेनमेंट सिस्टम देखील अपडेट केली जाईल. तथापि, इंजिनमध्ये काहीच बदल केला जाणार नाही, अशी शक्यता आहे.


MG HECTOR PLUS FACELIFT- एमजी हेक्टर फेसलिफ्ट डिसेंबर 2022 च्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते. या दरम्यान कंपनी अपडेटेड हेक्टर प्लस देखील आणेल. 2023 MG Hector Plus फेसलिफ्टला ADAS दिले जाऊ शकते. ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि फॉरवर्ड कोलिजन चेतावणी यांसारखे फीचर्स असतील.