Cheapest EV: या आहेत देशातील सर्वात स्वस्त 5 इलेक्ट्रिक कार, पाहा Photo

सध्या देशात इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी आहे. पण त्यांच्या किंमती पाहून अनेकजण हात आखुडता घेतात. सरकारही इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. गाड्या स्वस्तात मिळाव्या यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त 5 इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घ्या. 

Nov 09, 2022, 20:51 PM IST

Affordable Electric Cars: सध्या देशात इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी आहे. पण त्यांच्या किंमती पाहून अनेकजण हात आखुडता घेतात. सरकारही इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. गाड्या स्वस्तात मिळाव्या यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त 5 इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घ्या. 

1/5

Tata Tiago EV, Auto News

Tata Tiago EV: भारतात टाटा टियागो इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आहे. या कारची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 315 किमीची रेंज देऊ शकते.

2/5

Tata Tigor, Auto News

Tata Tigor EV: टाटा टिगोर अजूनही स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. या गाडीची किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू होते. पूर्ण चार्जवर 312 किमीची रेंज देखील देऊ शकते.

3/5

Tata Nexon EV, Auto News

Tata Nexon EV (Prime+ MAX): टाटा नेक्सन इव्ही प्राइम आणि मॅक्स दोन ट्रिममध्ये येते. या गाडीची सुरुवातीची किंमत 14.99 लाख रुपये आहे, जी 17.50 लाख रुपयांपर्यंत जाते. नेक्सन इव्ही प्राइमची रेंज 312 किमी आहे, तर मॅक्सची रेंज 450 किमी आहे.

4/5

MG ZS EV, Auto News

MG ZS EV: या गाडीची किंमत 21.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही गाडी 44.5 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. कार 419 किलोमीटरची रेंज देऊ शकते. ही गाडी एक्साइट आणि एक्सक्लुझिव्ह या दोन प्रकारांमध्ये येते.

5/5

Hyundai Kona EV, Auto News

Hyundai Kona EV:  ह्युंदाई कोना इव्हीची किंमत 23.79 लाख रुपयांपासून सुरू होते. कोना इलेक्ट्रिकला 39.2 kWh चा बॅटरी पॅक आहे. पूर्ण चार्जवर ही गाडी 452 किमीची रेंज देऊ शकते.