बिजींग : चीनमधील ऑटोमोबाईल कंपनी बिल्ड यॉर ड्रीम्सने (BYD) इलेक्ट्रिक MPV कार BYD e6 प्रायव्हेट बायर्ससाठी उपलब्ध केलं आहे. आतापर्यंत ही इलेक्ट्रिक कार फक्त कमर्शियल आणि फ्लीट कस्टमर्ससाठीच उपलब्ध होती. या कारची किंमत 29 लाख 15 हजार इतकी आहे. ही इलेक्ट्रिक एमपीवी कार टू  GL आणि GLX या 2 व्हेरिएंटमध्ये एसी फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते. भारतीय बाजारात ही कार गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. ही E6K कार  पूर्ण इलेक्ट्रिक MPV आहे. ही कार भारतातही खरेदी करता येणार आहे. (automobile electric car with 520km in single charge only 90 minutes know price all features)
 
ही इलेक्ट्रिक एमपीव्ही कार कंपनीच्या ई-प्लॅटफॉर्म बेस आहे. या कारमध्ये 71.7kWh लिथियम-आयरन फॉस्फेट बॅटरी आहे, जी 95hp आणि 180Nm जनरेट करते. कारचा टॉप स्पीड 130kph पर्यंत आहे. एमपीव्हीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रिक या कंपनीचा कारची रेंज. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 520km पर्यंत धावेल,  असा BYDचा दावा आहे. 


रेंज आणि फीचर्स


MPV ला रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देखील मिळतं. हे DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं. ज्याद्वारे कार 35 मिनिटांत 30-80 टक्के चार्ज होऊ शकते. पूर्ण चार्ज होण्यासाठी 90 मिनिटे लागतील. यात एलईडी डीआरएल, लेदर सीट्स, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट, ब्लूटूथ आणि वायफायसह 10.1-इंच रोटेटेबल टचस्क्रीन, इन-बिल्ट नेव्हिगेशन आणि एअर फिल्टरेशन सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.