रिचार्जशिवाय लाईफटाईम फ्री कॉल मिळवण्यासाठी हा खास प्लॅन
आजकाल सार्याच नेटवर्कमध्ये `फ्री वॉईस कॉल` मिळतात. जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झालेत. रोज नवं प्राईस वॉर सुरू होतं.
मुंबई : आजकाल सार्याच नेटवर्कमध्ये 'फ्री वॉईस कॉल' मिळतात. जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झालेत. रोज नवं प्राईस वॉर सुरू होतं.
अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन्स सुचवतात. पण कोणताही प्लॅन न घेता, पैसे न भरतादेखील एका खास अॅपच्या मदतीने तुम्हांला लाईफटाईम फ्री कॉलिंगचा आनंद घेणं शक्य होणार आहे.
सीम शिवाय हे अॅप काम करू शकेल
तुमच्या फोनमध्ये सीमकार्ड नसेल तरीही अॅपच्या मदतीने फ्री कॉलिंग करणं शक्य होणार आहे. अशा अॅपला वॉकी टॉकी किंवा ब्लू टुथ कनेक्टिव्हिटी अॅप म्हटले जाते. या अॅपचा फायदा मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ब्लूटुथ असणं गरजेचे आहे. अशाच एका अॅपचं नाव ' ब्लूटूथ वॉकी टॉकी' असं आहे.
१०० मीटरमध्ये बनवू शकाल कनेक्शन
ब्लूटुथ वॉकी टॉकीच्या माध्यमातून दोन फोन १०० मीटरच्या अंतरामध्ये जोडू शकता. या अॅपमुळे तुमचा फोन वॉकीटॉकी सारखा वापरता येतो. मात्र त्यासाठी दोन्ही फोनमध्ये हे अॅप आणि ब्लुटुथ असणं आवश्यक आहे.
अॅप कसं करेल काम ?
गूगल प्ले स्टोरमधून हे अॅप मोफत उपलब्ध आहे. ज्या दोन फोनमध्ये कनेक्टीव्हिटी करायची आहे त्यांना ब्लूटुथच्या माध्यमातून जोडणं गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करा.
ब्लुटुथने होणार कनेक्ट
कनेक्ट केलेल्या दोन्ही मोबाईलमध्ये ब्लूटुथने कनेक्टिव्हिटी ठेवणं गरजेचे आहे. वायफायच्या लिस्टवर क्लिक केल्यानंतर ब्लु टुथ डिवाईसची लिस्ट दिसेल.
ज्या नावावर क्लिक कराल त्यावर कॉल कनेक्ट होऊ शकेल.
रिंग होताना त्यावरील घंटीच्या आयकॉनचा रंग पिवळा होईल.
समोरून कॉल रिसिव्ह केल्यानंतर पिवळा रंग हिरवा होईल.
युजरच्या सोयीसाठी स्पिकर आणि म्युटचं बटणदेखील देण्यात आलं आहे.