नव्या वर्षात ग्राहकांना जिओचा झटका
जर तुमच्याकडे रिलायंस जिओचं सिम आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
मुंबई : जर तुमच्याकडे रिलायंस जिओचं सिम आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
ग्राहकांना फटका
जिओच्या कस्टमर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. ज्यांच्याकडे पोस्टपेड सिम आहे त्यांच्यासाठी ही बॅडन्यूज आहे. जर तुम्ही प्रीपेड रिचार्ज केलं पण तुमचं सिम हे पोस्टपेड असेल तर तुमचं नेटवर्क येणं बंद होणार आहे.
प्रीपेड की पोस्टपेड?
ज्या यूजर्सचं सिम पोस्टपेड आहे आणि ते त्यावर जर ते प्रीपेडचं कोणतंही रिचार्ज करत असतील तेव्हा ते रिचार्ज पोस्टपेड प्लानमध्ये काउंट होणार आहे. ज्यामुळे ते बिल सायकलमध्ये म्हणजेच ३० दिवसात ते संपणार आहे. यानंतर तुमच्या सिमवर नेटवर्क येणं बंद होणार आहे. इंटरनेट स्पीड देखील स्लो होणाप आहे. त्यामुळे सिम वापरण्यासाठी तुम्हाला पोस्टपेड प्लाननुसार रिचार्ज करावा लागणार आहे. ३० दिवसात बिल पेमेंट केल्यानंतरच ते सुरु होणार आहे.
जिओ कंपनीची चूक
ज्या पोस्टपेड यूजरचे सिम बंद होत आहेत. त्यामध्ये कंपनीची मोठी चूक आहे. जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड कस्टमर्सला प्लानमध्ये कन्फ्यूजन होत आहे. प्रीपेड सोबतच पोस्टपेड यूजरर्सला देखील फोनवर रिचार्ज करावा लागतो. जो प्लान प्रीपेड यूजरसाठी आहे तो रिचार्ज पोस्टपेड यूजर्स देखील करतात. यामुळे युजर्समध्ये गोंधळाचं वातावरण आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर पोस्टपेड प्लानची माहिती दिली आहे पण याचा उल्लेख नाही केला आहे.