बजाजची सर्वात पॉवरफुल बाईक लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत !
ऑप्शन ग्रीन, रेड आणि ब्लॅक या तीन रंगात ही बाईक उपलब्ध असणार आहे.
नवी दिल्ली: बजाज कंपनीची नवीन बाईक बजाज डोमीनार ४०० लवकरच लॉन्च होणार आहे. या बाईकची बुकिंग जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. बाईकमध्ये एबीएस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. बजाज डोमीनार ४०० ही पावरफुल बाईक म्हणून ओळखली जाणार. अशी कंपनीकडून शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्सशोरुम मध्ये डोमीनार ४०० बाईकची किंमत १ लाख ७४ हजार रुपये आहे. आधीच्या बजाज डोमीनार बाईक पेक्षा बजाज डोमिनार ४००ची किंमत १२ रुपये अधिक आहे. बजाज डोमीनार बाईकला २०१६ मध्ये भारतीय बाजारात दाखल करण्यात आलं होतं.
बजाज डोमीनार ४०० बाईकची वैशिष्ट्ये
या बाईकमध्ये ३७३ सीसी लिक्विड-कूल्ड फ्युअल- इन्जेक्टेड इंजीन देण्यात आले आहे. सिंगल- सिलेंडर इंजीन ३५ बीपीएच पॉवर आणि ३५ न्युटन मीटरचा टार्क जनरेट करणार आहे. डोमिनार ४०० बाईकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्सचा समावेश करण्यात आला आहे. बजाज डोमिनार बाईकची स्पीड १४८ किलोमीटर प्रतिघंटा आहे.
बाईकमध्ये ट्विन पोर्ट एन्जॉस्ट सिस्टमही असणार आहे. तसेच बजाज डोमिनारमध्ये आकर्षक ग्राफिक्स, कलर, आणि स्पोर्ट्स लुक देण्यात आला आहे. ऑप्शन ग्रीन, रेड आणि ब्लॅक या तीन रंगात ही बाईक उपलब्ध असणार आहे. या बाईकची टक्कर महिंद्रा मोजो, बीएमडब्लू जी३१०आर, होन्डा सीबी३००आर, केटीएम डूक २५० या बाईकसोबत होणार आहे.