नवी दिल्ली : बजाज ऑटोने आज पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक' लॉन्च केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कंपनीने ई-स्कूटर लॉन्च केली आहे. लॉन्चिंग कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नीति आयोगचे सीईओ अमिताभ कांत यांनी हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ही स्कूटर बजाजने अर्बनाइट या सब ब्रँड अंतर्गत लॉन्च केली आहे. यावेळी बजाज चेतकमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टमसह  (IBS) लॉन्च करण्यात आला आहे. स्टूटरमध्ये एक डिजिटल इंन्स्ट्रुमेंट पॅनल आहे. या डिजिटल इंन्स्ट्रुमेंट पॅनलमुळे बॅटरी रेंज, ओटोमीटर, ट्रीपमीटर याबाबत माहिती मिळणार आहे. स्मार्टफोन आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी हे इंन्स्ट्रुमेंट पॅनेल ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही सपोर्ट करेल.



स्कूटरला रेट्रो डिझाइन देण्यात आले आहे. राउंड हँडलॅप, कर्व पॅनल, एलॉय व्हाल, सिंगल साइड सस्पेंशन असे फिचर्स देण्यात आले आहेत. 


बजाजकडून या स्कूटरचे प्रोडक्शन २५ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. स्कूटरला १२ इंची एलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. यामुळे लांब प्रवासात गाडी पंक्चर होण्याची चिंता नसेल. 



या स्कूटरच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु ऑटो एक्सपर्टनी, ७० ते ८० हजारांच्या जवळपास स्कूटरची किंमत असण्याची शक्यता वर्तवली आहे.


२००६ मध्ये राहुल बजाज यांचा मुलगा राजीव बजाज यांनी कंपनीचे कामकाज ताब्यात घेतल्यानंतर, बजाजने स्कूटर उत्पादन पूर्णपणे बंद करुन केवळ मोटरसायकलवर लक्षकेंद्रीत केले होते. परंतु त्यांचे वडिल राहुल बजाज यांनी त्यांना स्कूटर बंद न करण्याचा सल्ला दिला होता.