`पल्सर १५० ट्विन डिस्क` बाजारात आली, अजून पाहिलीत की नाही?
पल्सर १५० ट्विन डिस्क बाईकमध्ये २३० मिमीचा मागचा डिस्क ब्रेक देण्यात आलाय
मुंबई : पल्सर १५० सीसी मध्ये उपलब्ध असेलल्या सिंगल डिस्क मॉडलसोबत बजाज ऑटोनं आपली पल्सर १५० ट्विन डिस्क ब्रेक मॉडल लॉन्च केलंय. नव्या पल्सर १५० ट्विन डिस्क ब्रेक नव्या रंगात आणि नव्या डिझाईनमध्ये दिसते. यामध्ये स्प्लिट सीट आणि स्प्लिट ग्रॅब रेल्स, अगोदरपेक्षा लांब व्हीलबेस आणि अगोदरपेक्षा मोठे आणि जाडे टायर्स वापरण्यात आलेत.
कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, पल्सर १५० ट्विन डिस्क बाईकमध्ये २३० मिमीचा मागचा डिस्क ब्रेक देण्यात आलाय... तर यात १४९.५ सीसी डीटीएस इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन १५ पीएस क्षमतेसोबत १३.४ एनएमचा टॉर्क जनरेट करतं.
ही बाईक ब्लॅक-ब्लू, ब्लू-रेड तसंच ब्लॅक-क्रोम या तीन रंगांत उपलब्ध असेल. स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकची किंमत ७८,०१६ रुपये (एक्स शोरुम, दिल्ली) निर्धारित करण्यात आलीय.