Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक तितक्याच आवडीने आणि उत्साहात ही बाईक खरेदी करतात. दणकट असणारी दुचाकी बरीच वर्षं टिकत असल्याने तिला ग्राहक पसंती देतात. दरम्यान बजाज पल्सरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाज आता बाजारपेठेत आपली Pulsar NS400 लाँच करत आहे. उद्या म्हणजेच 3 मे रोजी ही बाईक लाँच होत आहे. या बाईकमध्ये नेमके काय फिचर्स असतील, किंमत काय असू शकते याबद्दल जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pulsar NS400 चे काही फोटो लीक झाले आहेत. त्यात दिसत आहे त्यानुसार त्याचं डिझाईन थोड्या फार प्रमाणात NS200 सारखं आहे. ही दुचाकी स्ट्रीटफायटर कॅटेगरी अंतर्गत लाँच केली जाणार आहे. Bajaj Pulsar NS400 मध्ये मस्क्लूयर फ्यूएल टँक, NS200 सारखी स्टाईल आणि पल्सरचे काही कॉमन डिझाईन फिचर्स मिळत आहेत. 


फिचर्स


Pulsar NS400 मध्ये अपजेडेट हेडलाइट, LED प्रोजेक्टर लाइट्स, थंडरबोल्ट स्टाइल डीआरएल (डेटाइम रनिंग लाइट्स) यासह मॉडर्न टच दिला जाणार आहे. या बाईकमध्ये पेरोमीटर फ्रेम, अपसाइड डाऊन फोर्क (USD), मोनो शॉक युनिट दिलं जाणार आहे. तसंच एमआरएफच्या टायर्ससह 17 इंचाचे व्हिल्स, मागच्या बाजूला 140 सेक्शन टायर मिळतील. 


फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी यासह डिजिटल इंट्स्टूमेंट पॅनल, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दिली जाऊ शकते. 


इंजिन


Pulsar NS400 मध्ये 373 सीसीचं लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन दिलं जाऊ शकतं. हे इंजिन 40hp ची पॉवर आणि 35 Nm चा टॉर्क जनरेट करेल. इंजिनला 6 स्पीड गेअरबॉक्सशी जोडलं जाईल. याच्या टॉप मॉडेलमध्ये क्विकशिफ्टर मिळू शकतो. 


किंमत किती?


Bajaj Pulsar NS400 ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही बाईक 2 लाख ते 2.20 लाख किंमतीत लाँच केली जाऊ शकते. ही किंमत एक्स-शोरुमप्रमाणे असेल. 3 मे 2024 ला तिला लाँच केलं जाईल. ही बाईक लाँच झाल्यानंतर Husqvarna Svartpilen 401, ट्रायम्फ स्पीड 400 आणि KTM 390 Duke सारख्या दुचाकींना टक्कर देईल.