बजाज पल्सर... आता नव्या रंगात, नव्या ढंगात
मोटारसायकलीच्या बाबतीत एकेकाळी युवकांच्या गळ्याचा ताईत झालेली, बजाजची पल्सर, बजाज ऑटो पुन्हा नव्या रंगात आणि ढंगात आणणार आहे.
मुंबई : मोटारसायकलीच्या बाबतीत एकेकाळी युवकांच्या गळ्याचा ताईत झालेली, बजाजची पल्सर, बजाज ऑटो पुन्हा नव्या रंगात आणि ढंगात आणणार आहे. झी बिझनेसच्या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार नव्या रंगातील पल्सर या महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. बजाजने या नव्या बाईकला Pulsar NS 125 नाव दिलं आहे.
बजाज पल्सर बाईकची नवी आवृत्ती
तसेच असं देखील सांगण्यात येत आहे की, ही पल्सर नवीन रंगात येत असली, तरी ती आतापर्यंतची सर्वात स्वस्त पल्सर असेल. कंपनीने Pulsar NS 125 ला मागील वर्षी पोलंडमध्ये लॉन्च केलं होतं. पोलंडमधील युवकांनी मोठ्या प्रमाणात या बाईकला पसंती दिली. यानंतर कंपनीने या बाईकला कोलम्बिया आणि काही इतर देशात लॉन्च केलं.
याविषयी काही दिवसाआधी कंपनीकडून माहिती
काही दिवसांआधी बजाज ऑटोकडून ही माहिती देण्यात आली होती, कंपनी ऑगस्ट महिन्यात १२५ सीसी नवीन बाईक भारतात उतरवणार आहे. ही बाईक Pulsar NS 125 असल्याचा अंदाज आहे. हे याच्यासाठी कारण, कंपनीने या आधी भारतीय बाजारासाठी पल्सर १३५ ची निर्मिती बंद केली होती. आता पल्सर १२५ आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे.
खास डिझाईन
Pulsar NS 125 चं डिझाईन पल्सर एनएस रेंजच्या दुसऱ्या बाईक्स सारखं आहे. या बाईकमध्ये नवीन बॉडी ग्राफिक्स आणि नवीन कलर स्कीमचा वापर करण्यात आला आहे. बाईकमध्ये मॅट फिनिश एक्झॉस्ट मफलर, पसरट टायर आणि स्लिप्ट सीट्स दिलेली आहे. यात एक छोटा इंजीन काऊल आहे, ज्यामुळे बाईकला स्पोर्टस लूक येतो.