नवी दिल्ली : रिलायंस जिओ लॉन्च झाल्यापासूनच ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी जिओने न्यू ईअर ऑफरच्या अंतर्गत आपल्या युजर्ससाठी 1 GB वाल्या प्लॅनची किंमत कमी केली होती. याची किंमत ५०-६० रुपयांनी कमी करण्यात आली होती. पुन्हा एकदा कंपनीने युजर्ससाठी एक जबरदस्त कॅशबॅक ऑफर घेऊन आली आहे. यात कंपनी ३९८ किंवा त्याच्याहुन जास्त किंमतीच्या रिचार्जवर ४०० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. ३०० रुपयांचा कॅशबॅक सिलेक्टेड डिजिटल वॉलेटवर दिला जात आहे.


ऑफर १६-३१ जानेवारीपर्यंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माय जिओ अॅप रिचार्ज करताच जिओ अॅपच्या माय वाऊचर सेक्शनमध्ये ५०-५० रुपयांचे ८ वाऊचर ट्रांसफर होतील. ज्याचा वापर तुम्ही ३९८ किंवा त्याहुन जास्त किंमतीच्या रिचार्जसाठी तुम्ही करू शकता. तुम्ही एका वेळी फक्त एकच वाऊचर वापरू शकता. जसंजसे तुम्ही पुढे पुढे रिचार्ज करत जाल तसंतस तुम्हाला ५० रुपयांचा कॅशबॅक मिळत जाईल. ऑनलाईन रिचार्ज केल्यास १६ ते ३१ जानेवारीपर्यंत ही ऑफर तुम्हाला मिळेल. ३०० रुपयांचा कॅशबॅक अॅमेझॉन पे, फोन पे, फ्रिचार्ज आणि Paytm यावर मिळत आहे.


कोण किती कॅशबॅक देत आहे


रिलायन्स जिओचे रिचार्ज अॅमेझॉन पे च्या माध्यमातून केल्यास नवीन आणि जुन्या युजर्सला ५० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. मोबिक्विकवरून रिजार्ज करताना जिओच्या नवीन किंवा जून्या युजर्सने JIOGIFT कोड टाकणे गरजेचे आहे. तर ३०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. Paytm तून जिओचे रिचार्ज करताना ३९८ रुपये किंवा त्याहुन जास्त किंमतीचे रिचार्ज करताना नवीन युजर्सने NEWJIO कोड टाकणे गरजेचे आहे. तर त्यांना ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर जून्या युजर्सने  PAYTMJIO कोड टाका त्यावर ३० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.


नवीन युजर्सना १०० रुपयांचा कॅशबॅक


एक्सिस पे तून रिचार्ज केल्यावर जिओच्या नवीन युजर्सना १०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. जुने युजर्स असल्यास तुम्हाला ३० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. फोन पे वरून रिचार्ज केल्यास जियोच्या नवीन युजर्संना १०० रुपये कॅशबॅक तर जून्या युजर्सना ३० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.