Dangerous Android Apps to Delete Immediately : सध्याच्या काळात जवळपास सर्वजण स्मार्टफोन वापरतात. उत्तम सुविधा आणि नवनवीन फीचर्सच्या वापरासाठी आपण वेगवेगळे फ्री अ‍ॅप्स डाऊनलोड करतो. असं सांगितलं जातं की, थर्ड पार्टी अ‍ॅप्सला डाऊनलोड करु नये आणि नेहमी अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरद्वारेच (Google Play Store) डाऊनलोड करायला पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असलं तरी, गूगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) देखील असे काही अ‍ॅप्स आहेत जे तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरु शकतात. अशा अ‍ॅप्सला तुम्ही कधीही डाऊनलोड करु नका आणि जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर आत्ताच ते डिलीट करायला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच 35 अ‍ॅप्सबद्दल माहिती सांगणार आहोत, जे तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरु शकतात.


Android स्मार्टफोनधारकांनो सावधान...


सायबर सिक्यूरिटी टेक्नोलॉजी कंपनी बिटडिफेडंर (Bitdefender) ने असं सांगितलं की, अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सद्वारे वापरले जाणारे 35 लोकप्रिय अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये धोकादायक मॅलवेअर आढळून आलं आहे, जे यूजर्ससाठी अडचणीचं ठरु शकतं. हे असे अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये नसावेत किंवा असतील तर आत्ताच ते डिलीट करा.


हेच ते 35 अ‍ॅप्स जे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात...


Walls light - Wallpapers Pack, 
Big Emoji - Keyboard, 
Grad, Wallpapers - 3D Backdrops, 
Engine Wallpapers - Live & 3D, 
Stock Wallpapers - 4K & HD, 
EffectMania - Photo Editor, 
Art Filter - Deep Photoeffect, 
Fast Emoji Keyboard, 
Create Sticker for Whatsapp, 
Math Solver - Camera Helper, 
Photopix Effects - Art Filter, 
Led Theme - Colorful Keyboard, 
Keyboard - Fun Emoji, 
Sticker, Smart Wifi, 
My GPS Location, 
Image Warp Camera, 
Art Girls, 
Wallpaper HD, 
Cat Simulator, 
Smart QR Creator, 
Colorize Old Photo, 
GPS Location Finder, 
Girls Art Wallpaper, 
Smart QR Scanner, 
GPS Location Maps, 
Volume Control, 
Secret Horoscope, 
Smart GPS Location, 
Animated Sticker Master, 
Personality Charging Show, 
Sleep Sounds, 
QR Creator, 
Media Volume Slider, 
Secret Astrology, 
Colorize Photos, 
Phi 4K Wallpaper - Anime HD