AC खरेदी करताना `टन` आणि `स्टार रेटिंग`चा हा फंडा नेहमी लक्षात ठेवा
जल रसायनशास्त्राच्या अहवालानुसार, एअर कंडिशनर्सची क्षमता टनांमध्ये मोजली जाते.
मुंबई : आता उन्हाळा सुरु झाला आहे, या काळात लोकं उष्णतेमुळे हैराण होतात आणि एअर कंडिशनर (एसी) च्या पर्यायाकडे वळतात. कारण या काळात एअर कंडिशनर (एसी) एक असं साधन आहे. जे आपल्याला या उष्णेतेपासून बचाव करु शकते. परंतु एअर कंडिशनर (AC) विकत घेताना अनेक लोक आपूऱ्या माहितीमुळे कोणतीही AC घरी घेऊन येतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या खिशावर पडतो. त्यामुळे AC विकत घेताना ग्राहकांनी दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.
आता या दोन गोष्टी काय आहेत? याबद्दल जाणून घ्या
प्रथम, किती टन खरेदी करायचा आहे आणि दुसरे, किती रेटींग आहे. या गोष्टींबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. परंतु हे लक्षात घ्या की, या दोन्ही गोष्टींचं स्वत:चं एक महत्व आहे, जे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
जल रसायनशास्त्राच्या अहवालानुसार, एअर कंडिशनर्सची क्षमता टनांमध्ये मोजली जाते. परंतु येथे टनचा अर्थ ACचे वजन असा अजिबात होत नाही. सोप्या भाषेत समजून घ्या, जर तुम्ही एक टन एसी घेत असाल तर एक टन बर्फ जितका हा AC थंडावा देईल. त्यामुळे खोलीचा आकार पाहता किती टन एसी घ्यायचा हे ठरवा.
आता हे समजून घ्या की तुमच्या खोलीनुसार किती टन AC तुम्हाला ठीक असेल. 100 चौरस फूट खोलीसाठी 0.8 टन, 101 ते 150 चौरस फूट क्षेत्रासाठी 1 टन, 151 ते 200 चौरस फूट क्षेत्रफळाच्या खोलीसाठी 1.5 टन पुरेसे आहे. त्याच वेळी, 2 टन एसी 201 स्क्वेअर फुटांपेक्षा अधिक जागेसाठी योग्य आहे.
आता एसीच्या रेटिंगचा फंडा समजून घेऊ
प्रत्येक एसीला 1 ते 5 असे रेटिंग दिले जाते. या रेटिंगचा अर्थ वीज बचतीच्या बाबतीत आहेत. 5 रेटिंग प्रमाणे याचा अर्थ ते कमी उर्जा वापरेल. त्याचप्रमाणे, जसे आपण मागे सरकतो म्हणजे तुम्ही सर्वात कमी 1 अंकांचा विचार केला, तर तो AC सर्वाक जास्त वीज वापर.
हे रेटिंग कोण ठरवतं?
आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की, AC चं हे रेटींग्स ठरवतं तरी कोण? तर ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी ब्यूरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) याचं रेटिंग ठरवते. त्यामुळे एसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात घेतल्यास ते तुमच्यासाठी किफायतशीर ठरू शकते.