मुंबई : तुम्ही रिलायन्स जिओचा नवा स्वस्त ४जी स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी नव्या जिओच्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनचे लाँचिंग केले. या फोनसाठी रजिस्ट्रेशनही सुरु झाले. या फोनची किंमत अवघी १५०० रुपये इतकी आहे. इतकंच नव्हे तर तीन वर्षानंतर हे फोनचे १५०० रुपयेही तुम्हाला परत मिळणार आहे. 


या नव्या घोषणेनंतर तुम्ही म्हणत असाल की हा फोन फुकटात मिळतोय. तर असे नाहीये. जिओ फोनसाठी १५०० रुपये डिपॉझिट आहे. हे पैसै तीन वर्षांनी परत मिळणार हे तर कंपनीने सांगितलं आहे. 


मात्र त्यासाठी तुम्हाला दर ९० दिवसांत किमान एकदा तरी रिचार्ज करणं गरजेचं असणार आहे. किमान ९० दिवसांतून एकदा रिचार्ज कऱणाऱ्यांनाच १५० रुपयांची रिफंड मिळू शकणार आहे.