मुंबई: वोडाफोन, एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी जिओ आपल्या ग्राहकांसाठी खास स्वस्तात मस्त प्लॅन आणत असते. हे प्लॅन बजेटमधले तर असतातच पण त्याशिवाय आपल्याला जास्त फायदाही मिळवून देतात. कोव्हिड काळात जिओने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास वर्क फ्रॉम होम प्लॅन आणले आहेत. तर काही रिचार्जवर ज्यादा 2 किंवा 6 जीबीपर्यंत डेटाही मिळत आहे. आज आपण Jioचे बजेटमधील 5 बेस्ट प्लॅन कोणते आहेत ते जाणून घेऊया.


999 Jio Plan


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्लॅन तर सर्वात बेस्ट आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला 3 GB डेटा प्रत्येक दिवशी मिळणार आहे. याशिवाय जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 84 दिवस या प्लॅनची वैधता असणार आहे. 84 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये एकूण 252 GB डेटा आणि 100 SMS सुविधा मिळणार आहे. इतकच नाही तर जिओचे अॅप्स फ्रीमध्ये वापरता येणार आहेत. 


599 Jio Plan


या प्लॅनमध्ये दर दिवसाला 2 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे. याची वैधता 84 दिवस असणार आहे. 


444 Jio Plan


या प्लनची वैधता 56 दिवस असणार आहे. 112 GB डेटा म्हणजेच दर दिवशी 2 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे. 


2399 Jio Plan


हा प्लॅन सर्वात बेस्ट प्लॅन म्हणून ओळखला जातो. 1 वर्षासाठी याची वैधता आहे. 730 GB डेटा म्हणजेच दर दिवशी 2 GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय जिओ अॅप्सची सुविधा आणि 100 SMS अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. 


3499 Jio Plan


या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजेच 1 वर्षासाठी असणार आहे. यामध्ये ग्राहकांना 1095 GB डेटा मिळणार आहे. दर दिवशी 3 GB डेटा वापरता येणार आहे. 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि जिओ अॅप्सचा आनंद या रिचार्जमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे.