कमालच म्हणावी या Air Conditioner ची; किती कमी बिल देतो माहितीये?
उन्हाळा जवळ आला, की पंखे, एसी दुरुस्त करण्यापासून नव्यानं एसी खरेदी करण्यापर्यंतची तयारी सर्वजण करतात.
मुंबई : हिवाळा कुठच्या कुठे पळून गेला आहे. आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे उन्हाळ्याला. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुर्यदेवाने खऱ्या अर्थानं आपला दाह तीव्र केल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी काय अवस्था होणार, या विचारानेच आपल्याला घाम फुटू लागला आहे.
उन्हाळा जवळ आला, की पंखे, एसी दुरुस्त करण्यापासून नव्यानं एसी खरेदी करण्यापर्यंतची तयारी सर्वजण करतात.
यंदाच्या वर्षीसुद्धा असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे. पण, एसी लावत असताना काही गोष्टी विशेष लक्षात घेतल्या जातात. यामध्ये वीजबिलाचा मुद्दा कायम अग्रस्थानी असतो.
एसी लावला म्हणजे घर थंड होईल, पण बिलाचे आकडे मात्र घाम फोडतील असाच सर्वांचा समज. पण, आता यासाठीही पर्याय सापडला आहे.
कारण बाजारात एक असा एसी आला आहे जो सर्वसामान्य एसीच्या तुलनेत जवळपास 65 टक्के कमी वीज वापरतो.
हा आहे एक बेड एसी. तुम्ही ज्या बेडवर झोपता त्या भागापुरताच हा एसी हवा देतो. याची आखणीच एखाद्या तंबुसारखी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यामुळं पर्यावरणाचीही हानी होत नाही.
हा Air Conditioner अवघ्या तीन किंवा दोन बल्बसाठी लागणारी उर्जा वापरतो. म्हणजे जवळपास 400 वॅट वीजेवरच तो सहज काम करतो.
सौरउर्जेवरही हा एसी सहजपणे काम करतो. याचं आकारमान पाहिल्यास 11 इंच लांबी आणि 18 इंच रुंदी इतकं आहे. Tupik Bed AC खरेदी करतेवेशळी तुम्हाला सोबतीनं येणारा तंबूही खरेदी करावा लागणार, ज्यामुळं बेड चारही बाजूंनी बंद राहील.
परिणामी एसीची हवा गरजेपुरत्याच भागात प्रवाहित होऊन तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही थंड हवेचा आनंद घेता येईल.