नवी दिल्ली : वेगवेगळ्या कंपन्यांसोबतच एअरटेलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. एअरटेलने सोमवारला ‘द ऑनलाईन स्टोर’ची सुरूवात केली. या स्टोरच्या माध्यमातून कंपनी प्रिमियम स्मार्टफोन आकर्षक किंमतींमध्ये उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने इंस्टंट क्रेडिट व्हेरिफिकेशन अ‍ॅन्ड फायनान्सिंग आणि मंथली प्लॅन पॅकेज सादर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टोरने सुरूवातीला ऑनलाईन स्टोरवर iPhone-7 आणि iPhone-7+ सादर केलाय. आगामी दिवसात स्टोरमध्ये सर्वच प्रमुख ब्रॅण्डचे फोन उपलब्ध होतील. ३२जीबीचा iPhone-7 कंपनी केवळ ७७७७ रूपयांमध्ये सादर केलाय. ७७७७ सोबतच कंपनी ३०जीबीचा ४ जी डेटा प्लॅनही देत आहे. 


या प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग अनलिमिटेद फ्रि असेल. कंपनीने सीईओ आणि इंजिनिअर हरमीन मेहता म्हणाले की, ‘कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी नवीन डिजीटल ऑफर आणण्यात आली आहे. एअरटेलची ऑनलाईन स्टोर सर्व्हिस आता देशातील २१ शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.