मुंबई : महाराष्ट्राचं अराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही तासांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे बाप्पांच्या आगमनाचा उत्साह आहे. यामध्येच ई-कॉमर्स कंपन्यांनी वेगवेगळ्या स्मार्टफोन खरेदीवर ऑफर आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन, सॅमसंग आणि वनप्लस सारख्या स्मार्टफोनवर ही ऑफर देण्यात येत आहे. आयफोन ६ एस(रोज गोल्ड)३२ जीबीच्या फॉनवर अॅमेझॉनवर २३ टक्क्यांची सूट आहे. या फोनची किंमत ४६,९०० इतकी आहे, हा फोन तुम्हाला ३५,९९९ रुपयांना मिळेल. आयफोन ६एस(स्पेस ग्रे)वर अॅमेझॉनने ४४ टक्क्यांची सूट दिली आहे. २९, ५०० रुपयांचा हा फोन तुम्हाला २६,५७२ रुपयांना मिळेल. 


लिनोव्हो झेड- २ प्लस (ब्लॅक, ६४ जीबी) हा १९,९९० रुपयांच्या फोनवर ४० टक्के सूट दिली आहे. हा फोन तुम्हाला ११,९९० रुपयांना मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ऑन५ प्रो (गोल्ड) वर ६ टक्के तर वनपल्स-३ टीवर ७ टक्के सूट देण्यात आली आहे. कूलपॅड नोट ५ लाईट या फोनवर ९ टक्के सूट दिली जात आहे. विशेष म्हणजे मायक्रोमॅक्स सीजी ६६६ या फोनवर सगळ्यात जास्त म्हणजे ५२ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. मोटो जी-५ प्लसवरही सहा टक्क्यांची सूट जाहीर करण्यात आली आहे.