मुंबई: धावपळीच्या जगात अनेक जण बाईक वापरतात. शहरातल्या शहरात फिरण्यासाठी किंवा एका शहरातून जवळच्या शहरात जाण्यासाठी अनेकदा बाईकचा पर्याय उत्तम असतो.बा ईकमुळे वेळ वाचतो आणि मुख्यत: ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तेथे वेळेत पोहोचता येते. पण  एक लहानशी चूक तुमच्या जिवावर बेतू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह बाईकवरून प्रवास करत आहे. हायवेवरुन सुसाट वेगाने ही व्यक्ती कुटुंबासह जात आहे. गाडीचा वेग पाहाता हा लांबचा प्रवास असावा हे नक्की. बाईकवर त्या व्यक्तीसोबत एक महिला आणि एक लहान मुल सुद्धा आहे. त्याचबरोबर बाईकवर काही सामानाच्या पिशव्या सुद्धा आहेत. मात्र अचानक या गाडीला आग लागलीय. चालक गाडी चालवण्यात इतका गुंग आहे की त्याला गाडीला लागलेली आग सुद्धा लक्षात आली नाही. बाजूने जाणाऱ्या वाहतूक पोलिसांनी चालकाला सतर्क केल्यानंतर त्याची चूक त्याला लक्षात आली.  तो व्यक्ती तात्काळ गाडी थांबवतो आणि आपलं कुटुंब सुरक्षित आहे का ते तपासून घेतो. 


नेमकी चूक काय आणि आग लागली कशी


 ही व्यक्ती जेव्हा बाईकवरुन प्रवास करत होती; तेव्हा याने आपल्या बाईकला अनेक प्लास्टिकच्या पिशव्या लावल्या होत्या. लांबचा प्रवास असल्याने बाईकचा सायलेन्सर गरम झाला. आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या सायलेन्सरला चिकटल्या. हळूहळू प्लास्टिकच्या पिशव्यांनी पेट घेतला. ती आग पसरली आणि आजूबाजूच्या पिशव्यांनी सुद्धा पेट घेतला आणि आगीने रौद्ररुप घेतलं. 


काय काळजी घ्यावी


शक्यतो कुटुंबासोबत बाईकवरुन लांबचा प्रवास टाळावा. 
खूप सामान घेवून बाईकवरुन प्रवास करणं टाळावं. 
बाईकला पिशव्या किंवा इतर कोणतंही सामान लटकवू नये. 
सामान बाईकच्या कॅरिएरला बांधावं. 


सुदैवाने आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. मात्र हा व्हिडीओ पाहून आपण सुद्धा सतर्क व्हावं, हे आवाहन