मुंबई : सुरुवातीला नोकीया फोनचा बोलबाला होता. त्यानंतर सॅमसंगने मार्केट काबीज केले. आता तर अनेक कंपन्या बाजारात दाखल झाल्यात. यात अॅपलच्या आय फोन आणि मोटोरोलाच्या मोटो स्मार्टफोनला मागणी आहे. तसेच व्हीओ, ओपो, एमआय आदींनाही मागणी वाढलेय. तसेच नोकीयाने पुन्हा नव्याने स्मार्टफोनमध्ये उडी घेतलेय. आता नव्याने ब्लॅकबेरी लवकरच की २ लाईट हा कीपॅड असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅकबेरी २ लाईट हा किपॅडचा स्मार्टफोन बाजारात येण्याआधीच त्याचे फोटो सोशल मीडियावर लिक झाले आहेत. डिलनटेक वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा फोन पुढील महिन्यात आयएफए बर्लिनमध्ये सादर होणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तो ग्राहकांना उपलब्ध होईल, असे समजते. रेड, ब्लू आणि कॉपर अश्या रंगात तो मिळण्याची शक्यता आहे.


चीनी कंपनी टीसीएलने या फोनचे डिझाईन केलेय. ब्लॅकबेरीने की २ हा फोन गेल्या महिन्यात सादर केला आहे. त्याचे हे स्वस्त व्हर्जन असेल. कमी बजेट असलेल्या स्मार्टफोन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ब्लॅकबेरी या नव्या फोनचा वापर करत आहे. लिक झालेल्या फोटोनुसार या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा एलइडी फ्लॅश सह असेल आणि तो अँड्राईड ओरिओ ओएस सह येईल. या फोनची अंदाजे किंमत ४०० डॉलर्स म्हणजे २७६१८ रुपये असण्याची शक्यता आहे.