Instagram-Facebook Verification : भारतातील इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) युजर्स आता ट्विटरसारख्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ब्लू टिक्स (Blue tick) मिळवू शकणार आहेत. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणारी कंपनी मेटाने भारतातही आता व्हेरिफाईड सेवा सुरू केली आहे. मेटाने भारतात पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली आहे. त्यानंतर आता मेटा (META) ब्लूचे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी युजर्संना पैसे द्यावे लागतील. ट्विटरचे पेड व्हेरिफिकेशन काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. त्यानंतर आता तुम्हाला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही ब्लू व्हेरिफिकेशन बॅज मिळवण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मेटा व्हेरिफाईड फीचर भारतासह इतर अनेक देशांमध्येही लाँच करण्यात आले आहे. तुम्ही मेटा पडताळणीसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला नव्या फिचर्ससोबत ब्लू टिक मिळणार आहे. तसेच काही खास फीचर्स देखील देण्यात येतील जे तुम्हाला खूप आवडतील.


महिन्याला भरावे लागणार पैसे


भारतात, युजर्सना iOS आणि Android मोबाईलसाठी दरमहा 699 रुपये द्यावे लागतील. तर वेबवर हे फिचर वापरण्यासाठी युजर्सना दरमहा 599 रुपये खर्च करावे लागतील आणि त्यानंतरच त्यांना ब्लू टिक दिली जाईल. मात्र तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्मवर ब्लू टिक हवी असेल तर तुम्हाला सरकारकडून मंजूर झालेले ओळखपत्र दाखवावे लागेल. त्यानंतरच त्याची पडताळणी होईल आणि तुम्हाला ब्लू टिक मिळू शकेल. सरकारी आयडी तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर वापरल्या जाणार्‍या प्रोफाइल नाव आणि फोटोशी जुळणार्‍या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वैध असणार आहे.


या अटीही कराव्या लागणार पूर्ण


याशिवाय आणखी काही अटी युजर्सना पूर्ण कराव्या लागतील. पहिली अट म्हणजे युजरचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वय असलेल्या ब्लू टिक मिळणार नाही. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही पोस्टिंग हिस्ट्री देखील तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच ब्लू टिक देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


दरम्यान, मेटा सांगितले की, "आम्ही जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये या सर्व्हिसचे सुरुवातीच्या चाचणीचे चांगले परिणाम पाहिल्यानंतर आम्ही भारतात मेटा ब्लू टिकचा विस्तार करत आहोत. ब्लू टिक मिळवण्यासाठी पात्र होण्यासाठी, युजरचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे."