BMW 7 Series and i7 Launch : बीएमडब्ल्यूत मिळणार मूव्ही थिएटरचा फिल! कारमध्ये 31 इंची मोठा डिस्प्ले
लेटेस्ट BMW 7 Series and i7 कार नुकतीच लाँच झाली आहे. या कारमध्ये तब्बल 31 इंची मोठा डिस्प्ले बसवण्यात आला आहे. यामुळे मागे बसणाऱ्यांना मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहता येणार आहे.
BMW 7 Series and i7 Launch : BMW च्या कार म्हणजे स्पीड आणि स्टेटस सिम्बॉल. आता याच BMW कारमध्ये मूव्ही थिएटरचा फिल मिळणार आहे. लेटेस्ट BMW 7 Series and i7 कार नुकतीच लाँच झाली आहे. या कारमध्ये तब्बल 31 इंची मोठा डिस्प्ले बसवण्यात आला आहे. यामुळे मागे बसणाऱ्यांना मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहता येणार आहे. यामुळे आणखी एक रॉयल अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. या कार्सची स्टार्टिंग प्राईज 1.70 कोटी इतकी आहे(BMW 7 Series and i7 Launch).
BMW इंडियाने 7 सीरीज रेंजमधील पहली i7 इलेक्ट्रिक सेडान कार लाँच केली आहे. सेव्हेन जेनरेशनच्या या बीएमडब्ल्यू 7 सीरीजमध्ये सध्या अव्हेलेबल असलेल्या कार्सच्या मॉडलच्या तुलनेत डिजाइनमध्ये लक्षणीय बदल पहायला मिळत आहे. स्प्लिट एलईडी हेडलँप, नविन अलॉय व्हील आणि रॅपअराउंड LED टेललाइट्स देण्यात आव्या आहेत. बीएमडब्ल्यूच्या या दोन्ही कार रोड प्रजेंस आणि बोल्ड लुकमध्ये आहे. यामध्ये 20 इंची अलॉय व्हील देण्यात आले आहे.
BMW 7 Series आणि i7 चे जबरदस्त इंटेरिअर
या दोन्ही कारमध्ये लक्झरीयस इंटेरिअर देण्यात आले आहे. यामुळे कारला आणखीच रॉयल लूक मिळत आहे. या दोन्ही कारमध्ये डुअल स्क्रीन सेट-अपसह लाइव्ह कॉकपिट प्लस मिळत आहे. यात 12.3 इंची डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल आणि 14.9 इंची इंफोटेनमेंट यूनिट देण्यात आला आहे.
कारच्या डॅशबोर्डवर व्हेंटिवेशन आणि क्लाइमेट कंट्रोल मेन्यू देण्यात आले आहेत. टच-कॅपेसिटिव्ह कंट्रोलसह एक इंटरेक्शन बार देण्यात आला आहे. या कारमधून प्रवास करणाऱ्यांना शानदार रियर सीट एक्सपीरियंस देखील मिळणार आहे.
कारमध्ये मूव्ही थिएटरसारखा फिल
या कामध्ये मागे बसून प्रवास करणाऱ्यांना मूव्ही थिएटरचा फिल मिळणार आहे. यात 31.3-इंची 8K थिएटर स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले पाठी, पुढे, वर, खाली आपल्या सोईनुसार फ्लिप करता येऊ शकतो. कारच्या मागच्या दरवाजावरच याचा 5.5-इंची टचस्क्रीन कंट्रोल पॅनेल देण्यात आला आहे. BMW 7 Series स्टार्टींग प्राईज 1.70 कोटी रुपये आहे. तर, BMW i7 ची स्टार्टींग प्राईज 1.95 कोटी इतकी आहे. कंपनी ने या कारचे बुकिंग सुरु केले आहे.