BMW ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या दोन जबरदस्त बाईक्स
BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत दोन नव्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. K 1600 B आणि R nineT racer अशी या बाईक्सची नावे आहेत.
नवी दिल्ली : BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत दोन नव्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. K 1600 B आणि R nineT racer अशी या बाईक्सची नावे आहेत.
गोव्यात केलं लॉन्चिंग
कंपनीने K 1600 B आणि R nineT racer या दोन्ही बाईक्स गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया बाईक वीक 2017 मध्ये लॉन्च केल्या आहेत.
यापूर्वी BMWच्या 11 बाईक्स
K 1600 B आणि R nineT racer या दोन्ही बाईक्स लॉन्च करण्यापूर्वी बीएमडब्ल्यू मोटर्राडच्या भारतीय बाजारपेठेत ११ बाईक्स आहेत.
बाईकचे फिचर्स
BMW K 1600 B या बाईकमध्ये 1649cc चं 6 सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 160 Bhp ची पॉवर आणि 175Nm चं टार्क जनरेट करतं. या बाईकमध्ये रिवर्स गेअरचाही समावेश करण्यात आला आहे.
बाईकची किंमत
BMW K 1600 B या बाईकची किंमत भारतीय बाजारात 29 लाख रुपये (एक्स शो रुम) ठेवण्यात आली आहे. तर BMW R nineT racer या बाईकची एक्स शो रुम किंमत 17.30 लाख ठेवण्यात आली आहे.