नवी दिल्ली : वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून BMW कंपनीने एक नवी हायब्रिड ई-सायकल लॉन्च केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BMW कंपनीने अॅक्टिव्ह हायब्रिड ई-सायकल लॉन्च केली असून ही सायकल म्हणजे बाईक आणि माऊंटन बाईक यांचं एक मिश्रण आहे. ही सायकल तुम्ही खराब रस्त्यांवरही चालवू शकणार आहात आणि तेही कुठल्याही त्रासा शिवाय.


या ई-सायकलमध्ये ५०४ Wh ची हाय परफॉर्मंस बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ एका चार्जवर ही बॅटरी १०० किमीपर्यंतचं अंतर गाठू शकते. रात्री सेफ्टीसाठी या सायकलला एक LED लाईट देण्यात आली आहे. या सायकलचा टॉप स्पीड २५ प्रतितास आहे.


फिचर्सचा विचार केला तर, या ई-सायकलमध्ये नवी डिझाईन असलेली सीट लावण्यात आली आहे. ही सीट खूपच कंफर्टेबल आहे. त्यासोबतच ब्रेक लावताच तुम्हाला स्टेबल ठेवते.


किंमतीचा विचार केला तर युरोपमध्ये BMW च्या या ई-बाईकची किंमत ३,४०० यूरो (जवळपास २.६ लाख रुपये) आहे. मात्र, भारतात ही ई-बाईक कधीपर्यंत लॉन्च होणार आहे यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये.


बीईंग ह्यूमनची ई-सायकल बाजारात


याच वर्षी पर्यावरण दिवसाच्या मुहूर्तावर अभिनेता सलमान खान याने आपल्या बीईंग ह्यूमन ब्रॅण्ड अंतर्गत इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली होती. या सायकलचे दो वेरिएंट्स आहेत BH२७ आणि BH१२ हे दोन मॉडल उपलब्ध असून यांची किंमत ४० हजार रुपयांपासून ५७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.