BMW X3 M40i: भारतीय बाजारपेठेत नवी SUV दाखल झाली आहे. BMW ने आपली नवी कोरी X3 M40i लॉन्च केली आहे. ही कार आपला आकर्षक लूक आण दमदार इंजिनमुळे ग्राहकांचं लक्ष खेचून घेत आहे. कंपनीने Completely Built Unit अंतर्गत सादर केल आहे. ही एसयुव्ही फक्त 4.9 सेकंदात 100 किमीचा वेग पकडण्यास सक्षम आहे. या गाडीचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे. या गाडीचे मोजकेच मॉडेल विक्रीसाठी आणले जाणार आहेत. हे X3 SUV चं परफॉर्मन्स व्हर्जन आहे. यामध्ये M340i सेडानचं इंजिन देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने लॉन्च करताना या कारच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे. ही कार बूक करण्यासाठी 5 लाखांची टोकन रक्कम जमा करावी लागणार आहे. ही कार विकत घेण्यासाठी 86 लाख 50 हजार रुपये (एक्स शोरुम-भारत) मोजावे लागणार आहेत. 


BMW X3 M40i मध्ये एम ट्विनपावर टर्बोचं 3.0 लीटर, 6 सिलेंजर इन-लाइन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 355 बीएचपीची पॉवर आणि 500 एनएमचं पीक टॉर्क जनरेट करते. ह इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक स्पेटट्रॉनिक स्पोर्ट टान्समिशनसह येतं. यामध्ये पैडल शिफ्टर्सदेखील उपलब्ध आहेत. X3 M40i फक्त 4.09 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यात सक्षम आहे असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीचा टॉप स्पीड ताशी 250 किमी आहे.
 
X3 M40i ही M स्पोर्ट पॅकेजसह येते. यामध्ये M-स्पेशल किडनी ग्रिल्स, हेडलाइट्स, विंग मिरर आणि टेलपाइप्ससह ड्युअल टोन, 20-इंचाचे अलॉय व्हिल्स मिळतातत विंडो सराऊंड, रुफ रेल्स आणि किडनी ग्रीलवर स्टॅट्सला लाल रंगाच्या ब्रेक कॅलिपर्ससह काळ्या रंगाचं फिनिशिंग देण्यात आलं आहे. BMW ने ब्रुकलगिन ग्रे आणि ब्लॅक सफायर या रंगात आणली आहे.


या SUV मधील इंटिरियर कार्बन फायबरने सजवण्यात आलं आहे, जे पूर्णपणे मोटर स्पोर्ट 'M' थीमवर आधारित आहे. मल्टिफंक्शनसह यामध्ये M लैदर स्टियरिंग व्हील, M रंगात कंट्रास्ट स्टिचिंग आणि ओपन स्पोक इंटिरियर का स्पोर्टी टच आहे. ही कार मेमरी फंक्शन, एक्स्टिरियर मिरर पॅकेज, पॅनोरमिक ग्लास रुफ, वेलकम लाइट कार्पेटसह इलेक्ट्रिकल सीट एडजस्टमेंट, 6 डिमेबल डिझाइनसह एंबिएंट लायटिंग, इलेक्ट्रोप्लेटेड कंट्रोल आणि 3 झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रेल या फिचर्ससह मिळते. 


BMW X3 M40i मध्ये डिझाइनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले असून, यामुळे त्याला स्पोर्टी लूक मिळत आहे. BMW X3 M40i मध्ये 12.3 इंचाचा टचस्क्रीन सिस्टम, 12.3 इंचाा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनरामिक सनरुफ, वायरलेस चार्जिंग, एम्बिएंट लायटिंग, क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले आणि यासह अनेक फिचर्स मिळतात. यामध्ये एडेप्टिव्ह सस्पेंशन, व्हेरियेबल स्पोर्ट स्टियरिंग, परफॉर्मन्स कंट्रोलसह डिफरेंशियल (डिफरेंशियल लॉक) आणि एम स्पोर्ट सारखे फिचर्स मिळतात.