फक्त 11 हजार रुपयात बूक करा Alto K10, जाणून घ्या फीचर्स
मारुति अल्टो K10 देशातील लोकप्रिय हॅचबॅक वाहनांपैकी एक असून 18 ऑगस्ट 2022 रोजी नवीन अवतारात लाँच होणार आहे.
Alto K10 Booking: मारुति अल्टो K10 देशातील लोकप्रिय हॅचबॅक वाहनांपैकी एक असून 18 ऑगस्ट 2022 रोजी नवीन अवतारात लाँच होणार आहे. इंजिन आणि प्लॅटफॉर्म त्याच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर बदलांसह अपडेट केली आहे. आता मारुति सुझुकीने न्यू जनरेशन अल्टो K10 बुकिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. ही गाडी विकत घेण्याची इच्छा असणारे फक्त 11 हजार रुपये देऊन बूक करता येणार आहे. ग्राहक ही गाडी मारुति सुझुकी एरीना शोरुम किंवा वेबासाईटवरून बूक करु शकता. 2022 मारुति सुझुकी Alto K10 विद्यमान Alto 800 सोबत विकली जाईल. नवीन कार 12 व्हेरियंटसह येईल, त्यापैकी 8 मॅन्युअल ट्रान्समिशन आणि चार ऑटोमॅटिक व्हेरियंट असतील. अल्टो 800 पेक्षा ही गाडी थोडी मोठी असेल.
अल्टो K10 मध्ये ऑल ब्लॅक इंटीरियर कलर स्कीम दिली जाऊ शकते. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, पॉवर विंडो आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. शिवाय मागे पार्किंग सेन्सर्स, चार पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM आणि मॅन्युअल एअर कंडिशनिंग असणार आहे. सुरक्षिततेसाठी, कारला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस स्टँडर्ज इक्विपमेंटद्वारे सुरक्षा मिळेल.
इंजिन आणि ट्रान्समिशन
नवीन Maruti Suzuki Alto K10 मध्ये सेलेरियो आणि एस-प्रेस्सोसह 1.0-लिटर K10C ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन 6,000 आरपीएमवर 67 एचपी पॉवर आणि 3,500 आरपीएमवर 89 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्स मिळेल. अल्टो K10 ची किंमत 3.61 लाख ते 4.50 दरम्यान असू शकते.