`या` ऑनलाईन साईटवरून तिकीट बुक केल्यास व्हॉटस अॅपवर मिळणार कन्फर्मेशन !
ऑनलाइन इंटरनेट तिकिटिंग प्लॅटफॉर्म बुक माय शो ने व्हॉटस अॅप बिजनेस पायलट प्रोग्रॅमसोबत हातमिळवणी केली आहे.
नवी दिल्ली : ऑनलाइन इंटरनेट तिकिटिंग प्लॅटफॉर्म बुक माय शो ने व्हॉटस अॅप बिजनेस पायलट प्रोग्रॅमसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मच्या सगळ्या युजर्ससाठी व्हॉटस अॅप हे तिकीट कन्फर्मेशन चॅनेल बनवले आहे. अशा प्रकारे व्हॉटस अॅपचा वापर बिजनेससाठी करणारी हा पहिला भारतीय ऑनलाईन तिकीट ब्रँड आहे.
बुक माय शो चे प्रमुख रणदीप चावला यांनी सांगितले की, "व्हॉटस अॅप हे आपल्या देशातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला असल्याने आम्ही याचा वापर तिकीट कन्फर्मेशन चॅनल म्हणून करणार आहोत."
हे फीचर पुढच्या काहीच दिवसात सगळ्या युजर्ससाठी उपलब्ध होईल. बुक माय शो वरून तिकीट बुक करणाऱ्या प्रत्येक युजरला तिकीट कन्फर्मेशन आणि एम-तिकीटचा (मोबाईल तिकीट) क्यू आर कोड व्हॉटस अॅपवर मिळेल. त्याचबरोबर तिकीट कन्फर्मेशनचा ई-मेल देखील पाठवण्यात येईल.