मुंबई : चक्क एका रोबोट महिलेलाच नागरिकत्व दिल्याची धक्कादायक घटना सौदी अरेबियात नुकतीच घडली. दिसायला एखाद्या मानवी महिलेसारखी असलेली ही रोबोट हालचालीही तशाच करते. पण, आता त्याहून धक्कादायक असे की, बॉस्टन डायनॅमिक्स नावाच्या कंपनीने एक रोबॉट मिनीस्पॉट व्हर्जन बनवले आहे. जे चक्क कुत्र्यासारखेच दिसते.


पूर्णपणे वीजेवर चालतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्पॉटमिनी' नावाचे हे रोबॉट कुत्र्यांप्रमाणे दिसते तसेच, कुत्र्यासारखेच धावते. 'स्पॉटमिनी'चे वैशिष्ट्य असे की, हे व्हर्जन कोणत्याही घरात, ऑफिसमध्ये, परिसरात फिट होऊन जाते. पीवल्या रंगात असलेले या रॉबॉटचे मूळ वजन 25 किलोग्रॅम इतके आहे. पण, त्याला जर हातही जोडून हवे असतील तर त्याचे वजन 30 किलो होते. स्पॉटमिनी हा पूर्णपणे वीजेवर चालतो. तसेच, एकदा का याला चार्ज केला तर, तो 90 मिनीटांपर्यंत न थांबता काम करू शकतो. पण, त्याची ही कार्यकालमर्यादा ही तो काय काम करतो त्यावर अवलंबून असते.


जगातील सर्व रोबोटपेक्षा गतीमान


कंपनीने दावा केला आहे की, आजवर तायर झालेल्या सर्व रोबोट मध्ये हा सर्वात गतीमान आहे. कंपनीकडून या रोबोटचा एक व्हिडिओही लॉंच करण्यात आला असून, त्यात हा स्पॉटमिनी चक्क कुत्र्याप्रमाणे धावताना आणि हरकती करताना दिसतो. स्पॉटमिनी नावाच्या रोबोटचे पहिले व्हर्जन हे 2016मध्ये लॉंच करण्यात आले होते.