चेहऱ्याची ओळख पटली तरच सोबत येईल ही सूटकेस
खासकरून या सूटकेसचा फायदा असा की, आपण जरी आपली सूटकेस विसरलात तरी, तुमची सूटकेस मात्र तुम्हाला मुळीच विसरणार नाही.
मुंबई : प्रवास कितीही रम्य असला तरी, त्यात एकच गोष्ट कंटाळवाणी असते. ती म्हणजे प्रवासादरम्यान सोबत असलेल्या बॅगा. त्या उचलायच्या म्हणजे सर्वात मोठे आव्हान. अशा स्थितीत जर तुमची सूटकेस स्वत:हूनच तुमच्या सोबत चालू लागली तर मजा येईल ना? होय, असे घडू शकते. पण त्यासाठी तुमच्या चेहऱ्याची ओळख सूटकेसला पटायला हवी. पडलात ना गोंधळात. मग घ्या जाणून...
आयडेंटीफिकेशन आणि ट्रॅकींग अल्गोरिदमचा वापर
संशोधकांनी एक अशी सूटकेस तायर केली आहे जी तुमचा चेहरा ओळखून तुमच्या सोबत चालू शकेल. रोबॉटीक टेक्नॉलॉजीवर अधारीत बनवलेली आहे. ही सूटकेस चारपाई असून, १७० डिग्री वाईड अॅंगल कॅमेरा आणि पोजिशनींगसाटी लाईडर अशी यंत्रणा या सूटकेसमध्ये बसविण्यात आली आहे. आयडेंटीफिकेशन आणि ट्रॅकींग अल्गोरिदमचा वापर करून ही सूटकेस आपल्यासोबत चालते.
तुमची सूटकेस मात्र तुम्हाला मुळीच विसरणार नाही
या सूटकेससोबत एक ब्रेसलेटही येते. जे सूटकेसबाबत केली जाणारी छेडछाड किंवा सूटकेस ऑफ द ट्रॅक जाण्याबाबत माहिती देते. यात एक बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. जीचा वापर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी केला जातो. खासकरून या ट्रॅकरचा फायदा असा की, आपण जरी आपली सूटकेस विसरलात तरी, तुमची सूटकेस मात्र तुम्हाला मुळीच विसरणार नाही.
सूटकेसची ट्रायल सुरू
महत्त्वाचे असे की, ही सूटकेस घेऊन जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे बटन दाबण्याची गरज नाही. तर, सूटकेस स्वत:हूनच तुमचा चेहरा आणि हालचाली पाहून तुमच्या मागे मागे येईल. अर्थात अद्याप या सूटकेसची ट्रायल सुरू आहे. तसेच, ती बनविणाऱ्या कंपनीने प्रचंड गुप्तता बाळगली असून, ती केव्हा लॉन्च करण्यात येईल याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आली नाही.