मुंबई : महिंद्राने हल्लीच नवीन THAR कार लाँच केली आहे. ही कार लाँच होताच लोकांमध्ये ती खूप पॉपुलर झाली आणि आत्ता त्याला खूप मागणी येत आहे. नवीन महिंद्राच्या लाँचनेतर तुम्हाला बर्‍याच मॉडिफाइड महिन्द्रा थार एसयूवी पाहायला मिळाल्या असतील. त्याच बरोबर तुम्ही एसयूव्हीचे असे अनेक ऑफ-रोड व्हिडीओ देखील पाहिले असाल, ज्यामध्ये एक एसयूव्ही दुसऱ्या एका एसयूव्हीला बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे. तर कधी स्वत: आपल्या ताकतीने ऑफरोड बाहेर पडते. परंतु अलीकडेच महिंद्र थारचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये असे पाहायला मिळते की, एक एसयूव्ही समुद्रकिनार्‍यावर अडकली आहे आणि ती बाहेर काढण्यासाठी जेसीबीला बोलवावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ निशांत नरियानी नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. व्हीलॉगची सुरवात ही कार अडकली तेव्हापासून होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ति सांगत आहे की, ते समुद्र किनाऱ्यावर ड्राईव्ह करत असताना अचानक त्यांची महिंद्र थार या ठिकाणी अडकली आहे.


माहितमध्ये हे अद्याप समोर आलेले नाही की, ड्रायव्हरने समुद्र किनाऱ्यावर कार आणण्यापूर्वी 4WD अॅगेजला सुरु केले होते की, नाही?  परंतु व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकत आहे की, एसयूव्हीचे चारही चाके वाईटरित्या अडकले आहेत.


अनेक वेळा प्रयत्न करून चालकाने जवळपास उपस्थित असलेल्या लोकांची मदत घेतली. पण वाहन वाळूच्या आत जात होते. त्यामुळे तिला हलू शकले नाही. यानंतर कार चालकाने जेसीबीला फोन केला.जेसीबी चालक कारला वाळूमधून काढण्यासाठी विचार करु लागला, थोडावेळ विचार केल्यानंतर त्याने अखेर थारला बाहेर काढण्यास मदत केली आणि तो निघून गेला. हे सगळ प्रकरण पाहाता असे दिसत आहे की, थार कार चालवणाऱ्या व्यक्तीला ऑफ रोडरवर चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता. ज्यामुळे एसयूव्ही थार समुद्र किनाऱ्यावर अडकली.



महिंद्रा थारचे फीचर्स


महिंद्रा थारला न्यू जनरेशन-ऑन-फ्रेम चेसिसवर तयार केले गेले आहे आणि थार अधिक सुरक्षित आहे. ग्लोबल NCAP ने त्याला 4-स्टार सुरक्षितता रेटिंग दिली आहे. यात तुम्हाला LED, DRLs, अलॅाय व्हील्स, हार्ड रूफटॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ISOFIX माउंट, Apple CarPlay आणि Android Auto टचस्क्रीन डिस्प्लेसह असे फीचर्स मिळतील.


कंपनीने या कारला पूर्वीपेक्षा चांगली बनविली आहे, यात काळ्या रंगाचा केबिन, दुसर्‍या रांगेत फ्रंट फेसिंग सीट दिले गेले आहे. याव्यतिरिक्त, यात एक 17.8 सेंमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. कारच्या छतावर स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. यूझर्स ब्लू सेन्स ऍपच्या माध्यमातून आपले स्मार्टवॉच आणि मोबाईल फोन कारशी कनेक्ट करू शकतात.


महिंद्रा थार किंमत


कंपनीने 2 ऑक्टोबर 2020 रोजी ही कार लॉन्च केली आहे. त्याचे दोन व्हेरियन्ट AX आणि LX उपलब्ध आहेत. त्याची किंमत 9.8 लाख रुपये ते 13.75 लाख रुपयां दरम्यान आहे. AX ट्रिम पूर्णपणे ऑफ-रोडच्या शौकिन लोकांसाठी आहे. तर, LX ट्रिममध्ये अधिक कंफर्ट फीचर्स आहेत. तिची किंमत 12.49 लाख रुपये आहे.