BSA Gold Star 650 India Launch: प्रथमच डिसेंबर 2021 मध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली. BSA Gold Star 650 रेट्रो-स्टाईल मोटरसायकल यूके आणि युरोपियन बाजारपेठांमध्ये आधीच विक्रीसाठी आहे. आता, कंपनीने दावा केला आहे की ते 2023 पासून जगभरात लॉन्च करण्यात येणार आहे. मार्च  2023 च्या सुमारास भारतात येण्याची शक्यता आहे. यूकेमध्ये मॉडेलची किंमत £6500 (अंदाजे 6.23 लाख रुपये) आहे. मात्र, या बाईचे उत्पानद स्थानिक पातळीवर केले गेले तर भारतात त्याची किंमत सुमारे 2.9 लाख रुपये असू शकते. येथे त्याची स्पर्धा Royal Enfield Interceptor 650 आणि Kawasaki Z650RS सारख्या बाइक्सशी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


BSA Gold Star 650 ला DOHC सेटअपसह 652cc 4-वाल्व्ह, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. हे 6,000rpm वर 45bhp पॉवर आणि 4,000rpm वर 55Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. नवीन BSA बाईक ट्यूबलर स्टील, ड्युअल-क्रॅडल फ्रेमवर बांधली गेली आहे .  तिची रचना मूळ BSA गोल्ड स्टार्ससारखी आहे. यात टीयरड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी आणि रिव्हर्स स्वीप उपकरणे मिळतात. बाईकमध्ये हॅलोजन हेडलॅम्प आणि एलईडी टेललॅम्प देण्यात आले आहेत.


रेट्रो-बाइकला 18-इंच पुढची आणि 17-इंच मागील चाके आहेत. हे Pirelli Phantom Sportscomp टायर्ससह येते. यात ट्विन-पॉड अ‍ॅनालॉग स्पीडोमीटर आणि एलसीडी मल्टी-फंक्शनल डिस्प्ले, हँडलबार-माउंट यूएसबी चार्जर आणि स्लिपर क्लचसह टॅकोमीटर मिळतो. सस्पेन्शन बद्दल बोलायचे झाले तर यात 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ट्विन रियर शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स मिळतात.


ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर, ब्रेम्बो कॅलिपर समोर सिंगल डिस्क आणि मागच्या बाजूला ब्रेकसह उपलब्ध आहेत. हे ड्युअल चॅनल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सह येते. गोल्ड स्टार 12-लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येते. त्याचे वजन 213 किलो आहे.