जिओला टक्कर देण्यासाठी BSNLचा धमाकेदार प्लॅन
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपले दोन नवे धमाकेदार प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पाहूयात काय आहेत हे प्लॅन्स
मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपले दोन नवे धमाकेदार प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पाहूयात काय आहेत हे प्लॅन्स
पहिला प्लॅन ४२९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये ९० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि १जीबी इंटरनेट डेटा दररोज मिळणार आहे. तर ४२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे.
पहिला प्लॅन चार सप्टेंबरपासून तर दुसरा एक सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. यासोबतच इंटरनेट डेटा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी ४४४ रुपयांचा खास प्लॅन सुरु केला आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज चार जीबी डेटा आणि ही सिमा पार झाल्यावर ८० केबीपीएस (किलो बाइट प्रति सेकंद) या स्पीडसोबत डेटा सुरु राहणार आहे.
तसेच लँडलाईन फोन्सला प्रोत्साहन देण्यासाठी ४९ रुपयांच्या मासिक शुल्कासोबत प्लॅन सुरु करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याला २४० कॉल्स फ्री देण्यात येणार आहेत. त्यासोबतच रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे.