मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने  १५ ऑगस्टच्या निमित्ताने खास ऑफर लॉन्च केली आहे. ७१ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी व्हाईस, एसएमएस, स्पेशल टॅरिफ व्हाऊचर (एसटीव्ही) आणि कॉम्बो व्हाऊचरचा लाभ मिळणार आहे. बीएसएनएल कार्यरत क्षेत्रामध्ये ही सुविधा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ जून २०१५पासून मोफत रोमिंग सेवा देणारी बीएसएनएल पहिली ऑपरेटर कंपनी आहे. ३४९ रुपयांत मोफत व्हाईस कॉल कोणत्याही नेटवर्कसाठी मिळणार आहे. याबाबत बीएसएनएल बोर्डाचे संचालक आर के मित्तल यांनी ही माहिती दिलेय.


दरम्यान, याआधी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ६६६ प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज २  जीबी ४ जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता ६० दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण १२० जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत.